Mumbai Vidhan Sabha Election Results LIVE: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं आणि आता निकालाचा दिवसही उजाडला. यंदाच्या वर्षी मुंबईतील कैक मतदारसंघांमध्ये तुल्यबळ लढती पाहायला मिळत असून, काही नवखे उमेदवार पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात त्यांचं नशीब आजमावत आहेत. शहरातील वडाळा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यंदा निवडणुकीत विजयी ठरल्यास त्यांच्या नावे एका विक्रमाची नोंद केली जाणार आहे. हा विक्रम असेल सर्वाधिक वेळा आमदारकीचं शिवधनुष्य पेलण्याचा...
मुंबईतील विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारतं आणि मुंबईवर कोणाची सत्ता राहते यासंदर्भातील सर्व अपडेट पाहण्यासाठी इथं क्लिक करा...
23 Nov 2024, 10:01 वाजता
वरळी विधानसभेत कांटे की टक्कर...
वरळी विधानसभा; आदित्य ठाकरे दुसऱ्या फेरी अखेर 696 मतांनी आघाडीवर. आदित्य ठाकरे - 8236, मिलिंद देवरा - 7540, संदीप देशपांडे - 4787 मतं
23 Nov 2024, 09:36 वाजता
राहुल नार्वेकर यांच्या मतदारसंघात काय स्थिती? पहिले कल काय सांगतात?
कुलाबा मतदारसंघातून पहिल्या फेरीपासूनच राहुल नार्वेकर 5429 मतांनी आघाडीवर
23 Nov 2024, 09:35 वाजता
ऐरोली विधानसभा, दुसरी फेरी
भाजप उमेदवार गणेश नाईक 4491 मतांनी आघाडीवर
23 Nov 2024, 09:32 वाजता
ठाणे शहर विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार 2093 मतांनी आघाडीवर
संजय केळकर (भाजप) 4336
अविनाश जाधव (मनसे) 2243
राजन विचारे (ठाकरे गट) 1917
23 Nov 2024, 09:31 वाजता
झिशान सिद्दीकी पिछाडीवर, कांदिवली पूर्व मतदारसंघात काय स्थिती?
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे वरून सरदेसाई आघाडीवर. झिशान सिद्दीकी पिछाडीवर. कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे अतुल भातखळकर 4462 मतांनी आघाडीवर. कल्याण पश्चिम विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर आघाडीवर.
23 Nov 2024, 09:31 वाजता
निवडणूक निकालांनंतर छोटे पक्ष आणि अपक्षांचा भाव वाढणार
विधानसभा निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्षांचा भाव वाढणार असलयाचे बोलले जात असतानाच आताच्या घडीला इतर पक्षाचे डझनभर 12 उमेदवार आघाडीवर आहेत.
23 Nov 2024, 09:28 वाजता
149 कळवा मुंब्रा मतदार संघातून पहिल्या फेरीत जितेंद्र आव्हाड आघाडीवर
पहिली फेरी
जितेंद्र आव्हाड 8262
नजीब मुल्ला 4726
सुशांत सूर्यराव1696
नोटा 266
तर, शिवडी मतदारसंघातून अजय चौधरी 356 मतांनी आघाडीवर
23 Nov 2024, 09:25 वाजता
माहिममधून अमित ठाकरे पिछाडीवर
माहिममधून अमित ठाकरे पिछाडीवर, महेश सावंत आघाडीवर. मुंबईतील निकालांकडे सर्वांचं लक्ष
23 Nov 2024, 09:20 वाजता
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काय परिस्थिती?
ठाणे कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतमोजणी, पहिली फेरी
एकनाथ शिंदे - 5477
केदार दिघे - 1424
एकनाथ शिंदे मतांनी 4053 आघाडीवर
23 Nov 2024, 09:17 वाजता
वरळीतील पहिल्या फेरीतील निकालाची आकडेवारी
पहिली फेरी
आदित्य ठाकरे - 4169
मिलिंद देवरा - 3861
संदीप देशपांडे - 2391