मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर,सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रूळाच्या -देखभालीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवार, 21 एप्रिल रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मांटुगा ते मुंलुड डाऊन धीम्या, सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे अप- डाऊन तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल मार्गवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुख्य मार्गावर मांटुगा ते मुंलुड स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर स. 11.20 ते दु. 3.50 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. माटुंगाहून सुटणाऱ्या लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावरील वाहतूक स.10.57 ते दु. 3.52 वाजेपर्यत डाउन जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे. सीएसएमटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या धीम्या मार्गांवरील सर्व लोकल गाड्या स.11 ते संध्या. 6 वाजेपर्यंत आपल्या निर्धारित वेळापेक्षा 10 मिनिटे उशिराने धावणार आहे.
सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर स. 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लाॅक घेण्यात येणार आहे. स. 9.56 ते दु. 4.23 वाजेपर्यंत सीएसएमटी ते वांद्रे, अंधेरी, गोरगाव दरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. तर सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशी स. 9.53 ते दु. 2.44 अप- डाऊन वाहतूक बंद राहणार आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातील प्लॅटफार्म क्रमांक ८ वरून पनवेलकरीता स्पेशल लोकल चालवण्यात येणार आहे.
चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर स.10.35 ते दु.3.35 या वेळेत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील वाहतुक अप-डाउन धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. दरम्यान काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.