मुंबई : आतापर्यंतच्या ताज्या घडामोडी... फक्त एका क्लिकवर ग्रहकांना डिझेलची बुकिंग करता येणार ... म्हाडा, TETनंतर आता MIDC परीक्षेतरही गैरप्रकार.. ओमायक्रॉनच्या रूग्ण संख्येत वाढ... देशातील 11 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण....... पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर आता सीएनजी आणि घरगुती पाइपलाइन गॅसही महागला... आणखी काही महत्त्वाच्या बातम्या खालील प्रमाणे...
1. ग्राहकांना डिझेल थेट घरपोच मिळणार आहे.. फक्त एका क्लिकवर ग्रहकांना डिझेलची बुकिंग करता येणार आहे.. दिल्लीत डिझेलची डोअरस्टेप डिलिव्हरी सुरु करण्यात आलीये. त्यासाठी भारत पेट्रोलियम कंपनीनं हमसफर इंडियासोबत करार केलाय.. डोअरस्टेप डिलिव्हरीची सुविधा केवळ 20 लीटरपेक्षा कमी डिझेलची मागणी करणाऱ्यांसाठीच उपलब्ध असणार आहे. त्यामुळे या सुविधेला सफर-20 असं नाव देण्यात आलंय. या सुविधेमुळे उद्योग, मॉल्स, रुग्णालयं, बँका, शेतकरी, मोबाइल टॉवर, शिक्षण संस्थांसोबत लघु उद्योगांना याचा फायदा होणार आहे
2. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत आहे. डेल्टा व्हेरिएंटची जागा ओमायक्रॉन घेऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. जागतिक स्थितीवरून केंद्राने व्यक्त भीती केली. देशातील 11 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.
3. ओमायक्रॉनमुळे लग्न समारंभांवर येणार निर्बंध घालण्यात येणार आहेत. अनावश्यक प्रवास,गर्दी टाळण्याचं आवाहन सतत सरकारकडून करण्यात येत आहे. डेल्टापेक्षा ओमायक्रॉन वेगाने पसरत आहे.
4. म्हाडा, TETनंतर आता MIDC परीक्षेतरही गैरप्रकार झाल्याचा संशय वर्तवण्यात येतोय. मे. अॅपटेक लि. कंपनीनं ही परीक्षा घेतली होती. मात्र या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आलं होतं. TCSनं आधी घेतलेल्या शासकीय भरती परीक्षेत कमी गुण मिळालेल्यांना MIDCच्या परीक्षेत भरघोस गुण मिळालेत. त्यामुळे मे. अॅपटेक कंपनीनं घेतलेल्या या परीक्षेवरही संशय व्यक्त करण्यात येतोय.
5. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर आता सीएनजी आणि घरगुती पाइपलाइन गॅसही महागला आहे. महानगर गॅस लिमिटेडने 17 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगितले आहे. सीएनजीचे दर किलोमागे 2 रुपये तर घरगुती पाइपलाइन गॅसचे दर दीड रुपयाने वाढवण्यात आले आहेत.
6. ब्रिटनसह यूरोपमधील अनेक देशांत ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळतोय...त्याचवेळी भारताचे कोविड टास्क फोर्स प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सर्वात मोठी भीती व्यक्त केली...यूरोपीय देशांमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जी रुग्णवाढ पाहायला मिळते आहे...त्या वेगाने भारतात रुग्णवाढ झाल्यास दररोज 14 लाख नवीन रुग्ण आढळू शकतात, असे सांगून पॉल यांनी खळबळ उडवून दिली आहे...
7. भारतात तुलनेने ओमायक्रॉन बाधितांची संख्या कमी असली तरी युरोपच्या वेगाने रुग्णसंख्या वाढल्यास दररोज 14 लाख नवे रुग्ण भारतात आढळू शकतात, अशी भीती टास्क फोर्सने व्यक्त केली आहे
8. प्युअर्तो रिको इथं पार पडणारी 70वी मिस वर्ल्ड स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. स्पर्धेतील 17 सुंदरी आणि इतर स्टाफ मेंबर्सना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. 90 दिवसांत स्पर्धा कधी घ्यायची याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान भारताचं प्रतिनिधीत्व करणारी मनसा वाराणसी हिला देखील कोरोनाची लागण झाली आहे.