मोठी बातमी । मुंबईत १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा

अखेर सर्वसामान्यांची मागणी पूर्ण झाली आहे. 1 फेब्रुवारीपासून लोकल रेल्वे सेवा सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा सिग्नल दाखवला आहे.  

Updated: Jan 29, 2021, 01:42 PM IST
मोठी बातमी । मुंबईत १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा  title=
संग्रहित छाया

मुंबई : अखेर सर्वसामान्यांची लोकल सेवा सुरु करण्याची मागणी पूर्ण झाली आहे. (Mumbai local trains for all) 1 फेब्रुवारीपासून लोकल रेल्वे सेवा सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा सिग्नल दाखवला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना लोकल प्रवास ((Mumbai local) करता येणार आहे. मात्र, नियम असणार आहे. गर्दी होणार नाही अशारीतीने सर्व प्रवाशांसाठी ठरावीक वेळेत प्रवास करता येणार आहे. दरम्यान, मुंबईतील कार्यालयीन वेळांमध्ये सुधारणा करण्याची देखील विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी केली आहे.

कोविड-19 परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र 1 फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वाना यातून प्रवास करता येईल तसेच त्यांची होणारी गैरसोयही टळेल. 

या वेळेत लोकल प्रवासाला परवानगी

आताची मोठी बातमी । १ फेब्रुवारीपासून लोकल रेल्वे सेवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सर्वांना मुंबईत लोकलचा प्रवास सुरु करताना काही ठराविक वेळ देण्यात आली आहे. पहिली लोकल ते सकाळी 7 पर्यंत प्रवासाची परवानगी असणार आहे. पहिली लोकल ते सकाळी 7 पर्यंत प्रवासाची परवानगी आहे. दुपारी 12 - 4, रात्री 9 ते शेवटच्या लोकलमध्ये परवानगी असेल. तर गर्दी होणार नाही अशारितीने सर्व प्रवाशांसाठी
१ फेब्रुवारीपासून लोकल रेल्वे सेवा, असेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मुंबईतील कार्यालयीन वेळांमध्ये सुधारणा करण्याची देखील विनंती करण्यात आली आहे.

याशिवाय मुंबई व उपनगरातील विविध कार्यालये व आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी जेणे करून सर्वाना सुविधा होईल असेही यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात  म्हटले आहे.  विशिष्ट वेळांच्या मर्यादेत  मुंबईतील लोकल  रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते.