मुंबईतील पुढच्या पिढीला आपण काय देणार? शहराची वाटचाल पाहता हायकोर्टाला पडला प्रश्न

Mumbai News : भविष्य धोक्यात? मुंबईतली हुशार लोकं कुठे जाणार? हायकोर्टाचा सवाल. यंत्रणेपुढं उपस्थित केले काही महत्त्वाचे प्रश्न.   

सायली पाटील | Updated: Dec 6, 2024, 08:40 AM IST
मुंबईतील पुढच्या पिढीला आपण काय देणार? शहराची वाटचाल पाहता हायकोर्टाला पडला प्रश्न
Mumbai News bombay high court instructed authorities over effective Slum redevelopment

Mumbai News : मुंबईचा सर्वांगीण आणि सर्वार्थानं विकास करण्यासाठी मागील काही वर्षांमध्ये सातत्यानं प्रयत्न करण्यात आले. बैठ्या चाळींच्या या मुंबई शहरात मागील दशकभराच्या काळात भल्यामोठ्या गगनचुंबी इमारती, व्यावसायिक केंद्र आणि जागतिक दर्जाच्या वास्तू उभ्या राहिल्या. शहरातील दाटीवाटीची वस्ती असणाऱ्या झोपडपट्टी क्षेत्रांचाही पुनर्विकास करण्यात आला. पण, या साऱ्यामध्ये आता मुंबई उच्च न्यायालयानं लक्ष घालत अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर थेट सर्वोच्च न्यायलयाचंही लक्ष वेधलं. 

Add Zee News as a Preferred Source

भविष्यात मुंबई शहर नेमकं कसं असेल ही बाब केंद्रस्थानी ठेवत शहराच्या भवितव्याचा विचार करूनच विकासासाठीच्या योजना राबवाव्यात अशा सूचना न्यायालयानं केल्या आहेत. या महत्त्वपूर्ण निरीक्षणपर टीप्पणीमध्ये शहरातील मोकळ्या जागांच्या संवर्धनापासून अधिकाधिक हरितपट्ट्यांची गरजही लक्षात घेण्यात यावी असा सूर न्यायालयानं आळवला. 

भविष्यातील पिढीला आपण नेमकं काय देणार? याचा विचार करत मुंबईतील हुशार लोकसंख्या कुठे जाणार? शहरात ऑलिप्मिक किंवा त्यासम स्पर्धेचं आयोजन करायचं झाल्यास कुठे जाणार असा सवाल उच्च न्यायालयानं केला. गुरुवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान, झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची बाब अधोरेखित करत यामध्ये सर्वोच्च न्ययालयानं लक्ष घालण्याचा विनंतीपर सूर उच्च न्यायालयानं आळवला. 

हेसुद्धा वाचा : Earthquake Video : भक्कम घरं गदागदा हलू लागली अन्... 7.0 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर कुठे देण्यात आला त्सुनामीचा इशारा  

दरम्यान, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्या माहितीनुसार एसआरए योजनेअंतर्गत झोपडपट्टीधारकांची माहिती घेत त्यांच्या समस्यांसंदर्भता राज्य शासनाकडे असणाऱ्या तोडग्यांसंदर्भात तक्ता तयार करण्यात येत असून, त्यासाठीच्या वाढीव मुदतीची मागणी त्यानी न्यायालयाकडे केली. न्यायालयानंही ही विनंती मान्य करत 14 फेब्रुवारीला पुढील सुनावणी पार पडणार असल्याचं स्पष्ट केलं.  

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More