मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ९ तारखेला मुंबईत गिरगाव ते आझाद मैदान असा मोर्चा निघण्याची शक्यता आहे. भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा निघावा अशी मनसेची मागणी आहे. मात्र, पोलीस मोर्चासाठी या मार्गाला परवानगी देण्याची शक्यता कमी आहे. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांची देशातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
कुणाल कामरा राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी भायखळा ते आझाद मैदान या मार्गावर मोर्चाला परवानगी नाकारल्याचे समजते. भायखळा ते आझाद मैदान या मार्गालगत मुस्लिम धर्मियांची मोठी वस्ती आहे. देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मुस्लिम समाजही रस्त्यावर उतरला आहे. भायखळ्याच्या नागपाड्यातही गेल्या काही दिवसांपासून CAA विरोधी निदर्शने सुरु आहेत. त्यामुळे मोर्चा मुस्लिमबहुल भागातून गेल्यास समाजकंटक फायदा उचलण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे पोलिसांनी मनसेला मोर्चाचा मार्ग बदलण्यास सांगितल्याचे समजते. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका -राज ठाकरेंची सूचना
दरम्यान, मनसेच्या महामोर्चासाठी पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येणार आहेत. मुंबईला जाणाऱ्या वाहनधारक मनसैनिक यांचा टोल नाक्यावर कोणताही वाद होऊ नये म्हणून पुणे मुंबई , पुणे कोल्हापूर व पुणे सोलापूर या महामार्गावरील टोल नाक्यावर मनसेच्या वाहनाकडुन टोल वसुल करु नये याबाबत NHAI व सर्व टोलनाका व्यवस्थापनास निवेदन देण्यात आले आहे.