मुंबईच्या तापमानात मोठी वाढ

राज्यासोबतच मुंबईतही ऑक्टोबर हिटचा चटका जाणवण्यास सुरुवात झाल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईतील तापमानात अचानक वाढ झाली आहे.

Updated: Oct 5, 2017, 08:01 PM IST
मुंबईच्या तापमानात मोठी वाढ  title=

मुंबई : राज्यासोबतच मुंबईतही ऑक्टोबर हिटचा चटका जाणवण्यास सुरुवात झाल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईतील तापमानात अचानक वाढ झाली आहे.

मुंबईतील तापमान गुरुवारी ३५.८ अंश सेल्सिअसवर पोहोचलं. गेल्या दोन वर्षांमध्ये हे सर्वाधिक तापमान असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेने दिली आहे.

सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाने मुंबईकरांना झोडपल्यानंतर आता ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच हिटचा तडाखा सुरु झाला आहे. मुंबईतील तापमानाच्या पाऱ्याने पस्तीशी ओलांडली आहे. वाढत्या उकाड्याचा त्रास सर्वांनाच सोसावा लागत आहे.