लग्नात 'या' व्यक्तीकडून कधीच स्वीकारू नका गिफ्ट अन्यथा डोक्यावर हात मारत बसण्याची येईल वेळ!

Mumbai Theft in Wedding Reception: हे आरोपी गॅंगमधून काम करतात. ते मुंबईभर फिरत असतात. समारंभाला साजेसे असे कपडे घालतात. लग्नाच्या रिसेप्शनच्या ठिकाणी पोहोचतात. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 6, 2024, 03:50 PM IST
लग्नात 'या' व्यक्तीकडून कधीच स्वीकारू नका गिफ्ट अन्यथा डोक्यावर हात मारत बसण्याची येईल वेळ! title=
मुंबई लग्नात चोरी

Mumbai Theft in Wedding Reception: सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अनमोल क्षण असतो. त्यामुळे लग्न सराईत सर्वजण खर्च करताना मागेपुढे पाहत नाहीत. काही चोर, समाजकंटकांकडून हीच संधी हेरली जाते. आणि लग्न सराईत हात साफ करायला मिळते का हे ते पाहत असतात. अशाच चोरांचा पर्दाफार्श करण्यात पोलिसांना यश आलंय. बोरीवलीतून हा प्रकार समोर आलाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया . 

लग्नात गिफ्ट चोरण्याचा प्रयत्न 

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मानव सिसोदिया असे आरोपीचे नाव असून तो राजस्थानच्या कुडीया गावात राहतो.  मानव सिसोदिया हा लग्न समारंभात हजेरी लावतो. तिथे वर आणि वधुच्या आहेराची सफाई करतो. बोरीवलीच्या नारायण गार्डन येथील सोहळ्यात हातसफाई करण्यासाठी तो पोहोचला. यानंतर वधू-वर असलेल्या स्टेजवर गेला. दोघांचे अभिनंदन करत आपण जवळचे नातेवाईक असल्याचे भासवले. तिथे आलेले गिफ्ट चोरण्याचा प्रयत्न केला. रिसेप्शनचे फोटो कॅप्चर करणाऱ्या फोटोग्राफरला काहीतरी विचित्र प्रकार होत असल्याचे आढळले.  त्याने चोराला हटकले. यानंतर सिसोदिया हडबडला. फोटोग्राफरने जवळ असलेल्या लोकांना चोर सिसोदियाला पकडण्यास सांगितले.  

 सिसोदियाच्या टीमचा पर्दाफार्श

आरोपी मानव सिसोदिया याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोर्टात हजर करण्यापुर्वी त्याला पोलीस कस्टडीत ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलीस स्थानकातून देण्यात आली. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड पोलिसांनी 21 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. बोरिवलीमध्ये बुधवारी ही घटना घडली. झोन 11 चे डिसीपी आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस महेश बळवंतराव, पीएसआय संदीप गोरडे यांच्या टीमने सिसोदियाच्या टीमचा पर्दाफार्श केला.  

संपूर्ण गॅंगचा तपास सुरु

मानव सिसोदीया हा एकटा नसून हे आरोपी गॅंगमधून काम करतात. ते मुंबईभर फिरत असतात. समारंभाला साजेसे असे कपडे घालतात. लग्नाच्या रिसेप्शनच्या ठिकाणी पोहोचतात. बनावट गिफ्ट देतात आणि तिथले चांगल्या गिफ्टवर डल्ला मारतात. ज्या बॅगमध्ये सोन, चांदी किंवा कॅश असेल अशा बॅगना ते टार्गेट करतात. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली. सिसोदियाच्या गॅंगमध्ये आणखी कोण आहे? याचा पोलीस तपास करत आहेत.