Mumbai Youth Congress meeting: मुंबईतल्या टिळक भवन येथे झालेल्या युवक काँग्रेस बैठकीत (Youth Congress meeting) दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवक अध्यक्ष कुणाल राऊत विरोधात दोन गट भिडल्याचं दिसून आलंय. यावेळी एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकण्यात आल्या. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं पहायला मिळतंय.
शिवराज मोरे (Shivraj More) आणि अनिकेत म्हात्रे (Aniket Mhatre) या गटाने कुणाल राऊत यांना विरोध केला. कुणाल राऊत हे भारतीय युवक काँग्रेसचे (Youth Congress President) अध्यक्ष आहेत. त्यांच्या कामकाजावर नाराजी असल्याने त्यांना बदलण्याची मागणी करण्यात आली. त्यांना बदलण्याची मागणी हे पाहून राष्ट्रीय अध्यक्ष व्ही बी श्रीनिवास बाहेर निघून गेले. दरम्यान युवक काँग्रेसमध्ये कोणतेही वाद नसल्याचा दावा काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलाय.
युवक कॉंग्रेसच्या चार उपाध्यक्ष यांनी कुणाल राऊत यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बैठकीत वाद चांगलाच पेटला. आरोप झाल्यानंतर कुणाल राऊत यांचे समर्थक संतप्त प्रतिक्रिया नोंदवली. शाब्दिक कलह वाढल्यानंतर वाद चांगलाच पेटला आणि दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी बैठकीत राडा घातल खुर्च्या एकमेकांवर भिरकावल्या. त्यानंतर देखील वाद शांत झाला नाही. व्ही बी श्रीनिवास यांनी बैठकीतून काढता पाय घेतल्यानंतर वाद शांत झालाय.
मुंबईत युवक काँग्रेस बैठकीत राडा... आपापसात भिडले पदाधिकारी pic.twitter.com/zTcp1mI03w
— Seema Adhe (@AdheSeema) June 17, 2023
दरम्यान, काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी या राड्यावर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी प्रकरण टाळण्याचा प्रयत्न केलाय. बैठकीत काही विषयावरून मतभेद होतं असतात, वाद विवाद होतं असतात, त्यातूनच पुढं नेतृत्व घडत असतं, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हणालं आहे.