मुंबई : 'भाजपनं ठरवलं तर २४ तासांत मुंबईत भाजपचा महापौर बनवू शकतो' हे मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य शिवसेनेला चांगलंच झोंबलंय... त्यामुळे, अवघ्या काही तासांतच शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना शिवसेना स्टाईलनं प्रत्यूत्तर दिलंय.
'पैशांतून सत्ता सत्तेतून पुन्हा पैसा पैशातून पुन्हा सत्ता... काँग्रेस हेच करत आली शेवटी त्यांची माती झाली... मुंबईने अशा बादशाहांची माती केलीय...' असं राऊतांनी ट्विटरवर म्हटलंय.
इतकंच नाही तर, 'मुख्यमंत्री म्हणून बेळगावसह मराठी सीमा भाग महाराष्ट्रात आणायची हिंमत दाखवा... उद्धव ठाकरे स्वतःच मुंबईचे महापौरपद इनाम म्हणून झोळीत टाकतील' असा जळजळीत टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना हाणलाय.
पैशातून सत्ता सत्तेतून पुन्हा पैसा पैशातून पुन्हा सत्ता
कांग्रेस हेच करत आली शेवटी त्यांची माती झाली.
मुंबईने अशा बादशाहांची माती केलीय. https://t.co/glow32pFpj— Sanjay Raut (@rautsanjay61) October 26, 2017
मुख्यमंत्री महणून बेळगाव सह मराठी सीमा भाग महाराष्ट्रात आणायची हिम्मत दाखवा
ऊदधव ठाकरे स्वतःच मुंबईचे महापौर पद इनाम महणून झोळीत टाकतील— Sanjay Raut (@rautsanjay61) October 26, 2017
राज्यातील भाजप सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त सर्वप्रथम 'झी २४ तास'चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या रोखठोक मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला चांगलेच चिमटे काढले होते. 'मुंबई महापौर निवडीच्या दिवशी भाजपकडं बहुमत असूनही आम्ही आमचा महापौर बसवला नाही... आजही आम्ही ठरवलं तर २४ तासात मुंबईत भाजपचा महापौर बनवू शकतो' असा ठोस दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला होता.