मुंबई : राजद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या राणा दाम्पत्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयानं झटका दिला आहे. राणा दाम्पत्यानं घरचं जेवण मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र सत्र न्यायालयानं हा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला आता जेलमधील जेवणच जेवावं लागणार आहे. (session court rejected rana couple plea for permmited to home food in jail)
राणा दाम्पत्यानी चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दोघांची भायखळा आणि तळोजा जेलमध्ये रवानगी करण्यात आली. त्यामुळे दोघांना जेलमध्ये मिळणारंच जेवण जेवावं लागत होतं. त्यामुळे घरचं जेवण मिळावं, यासाठी दाम्पत्यांनी सत्र न्यायालयाला अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने या अर्जाचा विचार न केल्याने राणा दाम्पत्याला आता जेलमध्ये इतर कैद्यांना मिळणार जेवणच खावं लागणार आहे.
दरम्यान राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणारंय. त्यामुळे न्यायालय काय निर्णय घेतंय, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.