मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मुंबईत भेट झाली.
दक्षिण मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही भेट झाली. यावेळी सुमारे अर्धा तास दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. या बैठकीला युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हेखील उपस्थित होते.
भाजप आणि शिवसेनेचे बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर दोन राज्यातल्या या नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जातेय.
ममता आणि उद्धव या दोघांनीही ही बैठक औपचारिक असल्याचं म्हटलंय.
पंतप्रधानांवर जोरदार टीका करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी आधार कार्डासहीत केंद्राच्या अनेक निर्णयांवर टीका केलीय.
West Bengal CM Mamata Banerjee, who is in Mumbai, met Shiv Sena Chief Uddhav Thackeray today.
— ANI (@ANI) November 2, 2017