राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

Updated: Aug 21, 2019, 12:59 PM IST
राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई : कोहिनूर स्केअरप्रकरणी उन्मेष जोशींच्या चौकशीचा आजचा सलग तिसरा दिवस. या प्रकरणात भागीदार आणि बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकरांचीही चौकशी झाली. आजही शिरोडकर यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. शिरोडकर राज ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. सलग तीन दिवस उन्मेष जोशींची चौकशी होते आहे आणि उद्या राज ठाकरे यांनाही ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. राज्यात सध्या या प्रकरणाची चर्चा आहे. त्यातच या प्रकरणावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'मला वाटत नाही की या चौकशीतून काहीही निघेल. त्यामुळे २ दिवस थांबायला काही हरकत नाही.'

शिरोडकरांकडे कोहिनूरसंदर्भातल्या काही कागदपत्रांची मागणी ईडीनं केलीय. दरम्यान आठ तासात एवढा वेळ लागणारच कारण 12 वर्षाचा हा व्यवहार आहे. सगळे पेपर त्यांची तपासणी आणि त्यांची पाहणी करून म्हणून तेवढा वेळ जातो. असं उन्मेष जोशींनी स्पष्ट केलं. राज ठाकरे आणि माझे व्यवहारसंबंध 2008 पर्यंत होते आणि त्याच्यानंतर आमचा काही संबंध नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तर Ed चौकशीचा त्रास होतो आहे असं देखील मनोहर जोशी म्हणाले.