कर्ज स्वस्त, आरबीआयचे पतधोरण जाहीर

रिझर्व्ह बँकेने (आरबीआयने) वार्षिक पतधोरण जाहीर करताना रेपो दरात कपात केली आहे. त्यामुळे कर्ज दरात घसघशीत कपाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहकर्ज आता स्वस्त होणार आहे. याचा लाभ घर घेणाऱ्यांसाठी होणार आहे.

Updated: Apr 17, 2012, 12:43 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली 

रिझर्व्ह बँकेने (आरबीआयने) वार्षिक पतधोरण जाहीर करताना रेपो दरात कपात केली आहे. त्यामुळे कर्ज दरात घसघशीत कपाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहकर्ज  आता स्वस्त होणार आहे. याचा लाभ  घर घेणाऱ्यांसाठी होणार आहे.

तीन वर्षांनंतर रिझर्व्ह बँकेने  रेपो दरामध्ये ही कपात केली आहे. रेपो दरामध्ये अर्धा टक्याची कपात करण्यात आली आहे.  बँकेने विकासदर ७.३ टक्के राहणार असल्या‍चा अंदाज व्यक्त केला आहे. बँकेने कॅश रिझर्व्हव रेशो (सीआरआर) ४.७५ टक्यांच्या  वर कायम ठेवला आहे. बँक रेट ०.५ टक्यांनी कमी करुन ९ टक्क्यांवर आणला आहे. महागाईदेखील ६.५ टक्क्यांच्यावर राहण्याची शक्यता आरबीआयने वर्तविली आहे.

त्यामुळे यावर्षी महागाईचे सावट दूर होण्याची शक्य्ता कमीच आहे. सरकारी आकडेवारीनुसार महागाईचा दर मार्चमध्ये ६.८९  होता. परंतु, खाद्यान्न महागाई मार्चमध्ये  ९.९४ टक्केस नोंदविण्यात आली. फेब्रुवारीच्याय तुलनेत ही वाढ जवळपास ४ टक्यांची आहे.  कच्या   तेलाच्या वाढत्या किंमती, कर आणि वेतनवाढ याचा परिणाम महागाईवर होणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.