डॉक्टरच नाही, आई-वडिलांना जेलमध्ये धाडा- राज

"केवळ सोनोग्राफी सेंटर व डॉक्टरांवर कारवाई करून ही समस्या सुटणार नाही. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या आई-वडिलांनाही शिक्षा व्हायला हवी, हा मुद्दा जनजागृतीचा असून, आंदोलनाचा नाही, असेही ते म्हणाले".

Updated: Jul 10, 2012, 07:34 AM IST

www.24taas.com, औरंगाबाद

 

स्त्री भ्रूणहत्या भारतासह महाराष्ट्रातील एक भीषण समस्या... मुलीची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. अनेक मुलींचे हकनाक बळी जात आहेत. आणि आता याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुढे सरसावले आहेत. "केवळ सोनोग्राफी सेंटर व डॉक्टरांवर कारवाई करून ही समस्या सुटणार नाही. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या आई-वडिलांनाही शिक्षा व्हायला हवी, हा मुद्दा जनजागृतीचा असून, आंदोलनाचा नाही, असेही ते म्हणाले".

 

माजलगाव, अंबाजोगाई येथील खटल्यांच्या तारखेसाठी राज सोमवारी औरंगाबादेत होते. टोलनाका आंदोलनावरील आरोपांवर ‘आपण काही करायचे नाही आणि दुसरा चांगले काम करीत असेल तर त्यालाही ते करू द्यायचे नाही,’ अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या विरोधकांना टोलनाक्यांवर होणारी लूट शांतपणे पाहत बसणे आम्हाला शक्य नाही.

 

राज ठाकरे यांनी हा नवा मुद्दा उचलून धरला आहे. आणि पुर्वी वाघ वाचवा, त्यानंतर टोलनाका, आणि आता स्त्रीभ्रूण हत्या अशा विषयांवर आंदोलन छेडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेच लक्ष वेधून घेतलं आहे.