कमी 'खनखनाट', पण खेळ 'भन्नाट'!

अजिंक्य रहाणेला 60 हजार डॉलर देऊन राजस्थान रॉयल्सनं खरेदी केलं होतं. मात्र, सुरुवातीच्या 5 मॅचेसमध्येच त्यानं तब्बल 378 रन्स करत आपल्याला मिळालेल्या किंमतीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करुन दाखवली आहे.

Updated: Apr 17, 2012, 08:24 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

आयपीएलमध्ये फोर, सिक्स आणि विकेट्सची बरसात पाहयला मिळते. युवा क्रिकेटपटूंसाठी स्वत: ला सिद्ध करण्यासाठी हा उत्तम प्लॅटफॉर्म  आहे. या सीझनमध्ये मुंबईकर अजिंक्य रहाणे, कोलकाता नाईट रायडर्सचा विकेटकिपर मनविंदर बिसला आणि किव्हॉन किपर आपल्या टीमसाठी मोस्ट व्हॅल्यूएबल क्रिकेटपटू ठरले आहेत.

 

आयपीएलमध्ये स्टार क्रिकेटपटूंना मोठमोठ्या किंमती देऊन खरेदी केलं जातं. जे क्रिकेटपटू टीमसाठी मॅचविनर आणि  फायदेशीर ठरतील त्यांच्यावर सर्वाधिक बोली लावली जाते. तर स्थानिक क्रिकेटपटूंना फारशी किंमत मिळत नाही. मात्र, आयपीएलच्या पाचव्या सीझनमध्ये चित्र  पालटलेलं दिसंतय. ज्या क्रिकेटपटूंना मोठी रक्कम देऊन खरेदी केलं आहे. मात्र, तोच क्रिकेटपटू मोक्याच्या क्षणी टीमला विजय मिळवून देऊ शकलेला नाही. या उलट कमी किंमत मिळालेले क्रिकेटपटू चमकतांना दिसतायत. आणि यामध्ये प्रामुख्यानं उल्लेख करावासा वाटेल तो मुंबईच्या अजिंक्य रहाणेचा. राजस्थान रॉयल्सकडून खेळणा-या या क्रिकेटपटूनं आपल्या बॅटिंगमधील कौशल्यानं टीमच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली आहे.

 

अजिंक्य रहाणेला 60 हजार डॉलर देऊन राजस्थान रॉयल्सनं खरेदी केलं होतं. मात्र,  सुरुवातीच्या 5 मॅचेसमध्येच त्यानं तब्बल 378 रन्स करत आपल्याला मिळालेल्या किंमतीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करुन दाखवली आहे.

 

अजिंक्यनं तर आपल्या खेळानं आपली उपयुक्तता सिद्ध करुन दाखवली आहे. कमी किंमत मिळालेल्या त्याच्या सारख्याच किव्हॉन कूपर आणि मनविंदर बिस्ला या क्रिकेटपटूंनीही मोठी किंमत मिळालेल्या क्रिकेटपटूंपेक्षा जबरदस्त कामगिरी करुन दाखवली आहे.