www.24taas.com, मुंबई
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय... पण त्यांनी हा राजीनामा का दिला? काय झाले होते त्यांच्यावर आरोप... कुणी केले होते हे आरोप... टाकुयात, या सर्व मुद्द्यांवर एक नजर...
जलसंपदामंत्री असताना अजित पवारांनी अवघ्या तीन महिन्यांत सर्व नियम डावलून २० हजार कोटींच्या निधीचं वाटप केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या प्रकरणी भाजपनं चौकशीची मागणी केलीय.
अजित पवारांवर आरोप...
- जलसंपदा मंत्री असताना प्रकल्पांना दिलीत झटपट मंजुरी
- केवळ तीन महिन्यांत केलं 20 हजार कोटींच्या निधीचं वाटप
- विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या गव्हर्नर काऊन्सिलिंगला धाब्यावर बसवून केलं निधीचंच सिंचन
याबाबत विरोधकांनीही अजित पवारांच्या झटपट कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती.