उद्धव ठाकरे मोठा माणूस, मी छोटा- अजित पवार
उध्दव ठाकरे हा मोठा माणूस आहे, त्यांच्याविषयी माझ्यासारख्या छोट्या माणसानं बोलणं उचित नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला मारलाय.
घ्या पायताण आणि हाणा मला- अजित पवार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण करताना त्यांचा अस्सल ग्रामीण बाज समोर येतो. सातारा दौ-यावेळी एकाठिकाणी भाषणात गावाचं नाव उच्चारताना अजितदादांची चांगलीच तारांबळ उडाली.
शुभदामधील गाळ्यांचं गौडबंगाल
अनधिकृत बांधकामांशी आपला काहीही संबंध नसल्याचा खुलासा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झी मीडियाकडे केला आहे.
`सुखदा-शुभदा`मध्ये अजित पवारांचे चार गाळे!
अजित पवारांचे चार गाळे असल्याच उघड झालं आहे.
पुन्हा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक हल्ला
गेले काही महिने शांत झालेलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं शाब्दिक युद्ध आता पुन्हा सुरू होण्याची चिन्हं आहेत. या संघर्षाला आणखी नवं निमित्त झालं ते मेट्रो चाचणीचं...
`त्या` इमारतीत माझा एकच फ्लॅट आहे - अजित पवार
सुखदा-शुभदा प्रकरणी रणजित देशमुखांनी केलेल्या आरोपांना अजित पवारांनी पत्युत्तर दिलंय. आपला त्या इमारतीत एकच फ्लॅट आहे.
`शुभदेतले आठ बेनामी फ्लॅट अजित पवारांचे`
मुंबईमध्ये वरळीच्या शुभदा हाऊसिंग सोसायटीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसऱ्यांच्या नावावर फ्लॅट घेतल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री रणजीत देशमुख यांनी केलाय.
सुखदा-शुभदा : मुंबईतला आणखी एक `आदर्श`
मुंबईत गाजलेल्या आदर्श घोटाळ्याचा वाद अजूनही शमला नसताना वरळीत सुखदा-शुभदा सोसायटीत सदस्य असलेल्या राजकीय नेत्यांनी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं नोटीस बजावलीय.
'अजित पवार लाचखोर मंत्री'
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कॅगनं आपल्या अहवालात जलसंपदा खात्याची पोलखोल केलीय.
अजित पवार रिकाम्या बाकांकडे बघून खाली बसले!
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विधानसभेत सर्वपक्षीय बहिष्कार सुरूच आहे. विरोधकांनी ‘क्लेश’ आंदोलन सुरू केले आहे. ज्यावेळी अजित पवार बोलायला उभे राहिले त्यावेळी विरोधी आमदारांनी सभागृहाबाहेर जाणे पसंत केले. त्यामुळे सभागृहातील विरोधी बाके अचानकपणे रिकामी झालीत. या रिकाम्या बाकांकडे बघून अजित पवार खाली बसलेत.
‘आत्मक्लेष नव्हे, आत्मचिंतन करा!’
‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चूक झाली म्हणून ‘आत्मक्लेश’ केला पण राष्ट्रवादीनं विदर्भामध्ये भाजप सेनेशी युती करुन जी चूक केलीय त्यावर त्यांनी आत्मचिंतन करावं’ असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलाय.
आमच्यासाठी 'तो' विषय संपला आहे- सुप्रिया सुळे
अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्याचा विषय आता आमच्यासाठी संपला आहे. असे, म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांची बाजू घेतली आहे.
अजित पवार बसलेल्या जागेवर गोमूत्र शिंपडले?
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आत्मक्लेश आंदोलनाचे पडसाद आज कराडमध्ये उमटले. यशवंतराव चव्हाण यांचं समाधीस्थळ प्रीतीसंगमावर शिवसेना, मनसे आणि भाजपनं आंदोलन केलं. आंदोलकांनी प्रीतीसंगमावर गोमूत्र शिंपडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी विरोधकांना प्रीतीसंगमावर जाण्यापासून रोखले. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.
अजित पवारांना उदयनराजे भोसलेंचा चिमटा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेजबाबदार वक्तव्याचा पश्चाताप झाला आणि त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं. मात्र, त्यांच्या आंदोलनाची खिल्ली राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उडविली. त्याचबरोबर जोरदार चिमटाही काढला.
आत्मक्लेशानंतर बदल घडेल?
एरव्ही आपल्या टगेगिरीची जाहीर कबुली देणा-या अजितदादांमध्ये या आत्मक्लेशानंतर खरंच बदल घडेल का याची चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे.
अजित दादांचं आत्मक्लेश उपोषण संपलं
कराडमध्ये यशवंतरावांच्या समाधीस्थळी सकाळपासून सुरु केलेलं आत्मक्लेश उपोषण अजित पवार यांनी सोडलं. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही माहिती दिली.
सेना-भाजप कार्यकर्ते रस्त्यावर, अजित पवारांची नौटंकी
अजित पवारांच्या आत्मक्लेशाविरोधात साता-यातील शिवसैना कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. दत्त चौकात शिवसैनिकांनी अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली. तर यशवंतराव यांच्या पायाशी बसून अजित पवारांना सुबुद्धी सुचेल, अशी अपेक्षा गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केलीये.
ही अजित पवारांची नौटंकी – राजू शेट्टी
वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कराडमध्ये गांधीगिरी सुरु केलीय. यावर शेतकरी संघटनेनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी हल्लाबोल चढविला. ही अजित पवार यांची नौटंकी आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली.
राज ठाकरेंची अजित पवारांवर पुन्हा टीका
वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कराडमध्ये गांधीगिरी सुरु केलीय. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. आता करून काय उपयोग, असा सवाल राज यांनी उपस्थित केलाय.
अजित पवारांची गांधीगिरी, कराडमध्ये आत्मक्लेश
वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कराडमध्ये गांधीगिरी सुरु केलीय. सामाजिक जीवनात जे काही घडलं त्याच प्रायश्चित घेण्यासाठी आपण येथे आलोय, असं सांगत अजित पवार कराडमध्ये दाखल झाले आहेत.