शरद पवार, अजित पवार आणि मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवडमध्ये!
पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार असे तिघेही एकत्र येत आहेत. निमित्त आहे सायन्स पार्कच्या उद्घाटनाचं... 8 तारखेला हा कार्यक्रम होत आहे. या तीनही नेत्यांकडून पिंपरी-चिंचवडमधल्या नेत्यांच्या आणि नागरिकांच्या ब-याच अपेक्षा आहेत.
मुख्यमंत्र्यांचं विधान चुकीचं - अजित पवार
मुख्यमंत्री खोटं बोलत असल्याची जोरदार टीका करत अजित पवारांनी खळबळ उडवून दिली आहे. राज्य बँकेवर प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतरच लायसन्स मिळालं, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. याचा समाचार घेताना, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना खोटं ठरवलं.
ज्यांनी बँका काढल्या नाहीत, त्यांनी शिकवू नये- अजितदादा
काल नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यांनी आयुष्यात एकही सहकारी संस्था काढली नाही की चालवली नाही.
अजितचंद, छगनचंद नावाने बॅंक बुडली असती- राज
नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फटकेबाजी केली. आहे एका कार्यक्रमात राज ठाकरे आणि नितीन गडकरी एकत्र आले होते.
राज ठाकरेंनी केली भुजबळ आणि अजित पवारांवर टीका
राज ठाकरें यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात खास उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी छोटोखानी भाषण केलं.
अजित पवारांनी दिलंय आयुक्तांना अभय
पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी यांना हटवण्यासाठी पालिकेतील नगरसेवक आणि अधिका-यांनी मोर्चेबांधणी केल्याचे वृत्त दाखविल्यानंतर नगरसेवकांना चांगलाच चाप बसला.
अजित दादांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांना आमंत्रण!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी-चिंचवड या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विकास कामांच्या उद्घाटनाला येणार आहेत. तेही खुद्द अजित पवार यांच्या सांगण्यावरून....
सरकार-विरोधकांचे साटेलोटे, मनसेचा गंभीर आरोप
सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेली एसआयटी एक फार्स असल्याचा आरोप मनसेनं केलाय.
बिनखात्याचे मंत्री अजित पवारांकडे अर्थ-ऊर्जा खाते
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अर्थ आणि ऊर्जा खात्याचा पदभार स्वीकारला. राज्याच्या सामान्य विभागाकडून अशा प्रकारचे नोटीफिकेशन जारी करण्यात आले.
पिंपरी-चिंचवडमध्ये RTO एजंटची गोळ्या घालून हत्या
पिंपरी चिंचवडमध्ये काल रात्री चिखली परिसरात झालेल्या गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात ४५ वर्षीय आर टी ओ एजंट बाळासाहेब मिसाळ यांचा मृत्यू झालाय. यामुळं पिंपरी चिंचवड मधील गुन्हेगारीनं कळस गाठल्याचं सिद्ध झालंय.
दादा-बाबांचे मानापमान ‘नाट्य’ तर पवारांचा तडका
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ९३वे नाट्यसंमेलन हे जणू मानापमानाचे व्यासपीठ ठरल्याचे दिसून आले. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थित दादा-बाबांचे बोलनाट्य दिसले. यावेळी दादांनी मागितले आणि बाबांनी देऊन टाकले, अशी कुजबूज कवी मोरोपंत नगरीत कुजबूज ऐकायला मिळाली.
अजित पवारांच्या नाट्यपरिषद पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
नाट्यसंमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात अजित पवार यांनी नाट्य परिषदेच्या पदाधिका-यांना कानपिचक्या दिल्या. सरकारनं नाट्य परिषदेला पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचं जाहीर केल आहे.
सीसीटीव्हींचं जाळं... पुण्यात नव्हे, फक्त अजित दादांच्या परिसरात
दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर असलेल्या पुण्यात सीसीटीव्ही बसवण्यास मुहूर्त मिळत नाही. मात्र, अजित पवार यांनी, ते राहत असलेल्या भोसले नगर परिसरात सीसीटीव्हीचं जाळं उभारला आहे. तेही महापालिकेच्या पैशातून...
बाबा-दादांमध्ये पवारांच्या वाढदिवसाने ‘गोडवा’
केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाचं नागपूर विधान भवन परिसरात सेलिब्रेशन करण्यात आलं.. यावेळी १२ वाजून १२ मिनिटांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केक कापून पवारांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी गोडवा वाढला तो बाबा आणि दादांमध्ये.
अजितदादांचं पिंपरी-चिंचवड, बनलं गुन्हेगारांचं नंदनवन
पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीनं कळस गाठला असतानाच, एक धक्कादायक घटना उघड झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रोहित उर्फ अप्पा काटे यांनी एका भंगार व्यावसायिकाला एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा भोसरी स्थानकात दाखल झालाय.
अजितदादांनी केला सरकारचा वांदा
हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. अजित पवारांचं उपमुख्यमंत्री पद आणि सिंचन घोटाळ्याच्या मुद्यावरुन विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. अजितदादांमुळे सरकारचा वांदा झाल्याचे दिसतआहे.
अजित दादा बिनखात्याचे मंत्री!
कोणत्याही मुद्द्यावर विधीमंडळात चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली, तरी त्यांच्याकडे अद्याप कोणती खाती देण्यात आलेली नाहीत.
काकांच्या सोहळ्याला अजित पवारांची दांडी
पुण्यात `लोकनेते शरद पवार` या पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दांडी मारली.
`दादा उठ की रं....` - सुप्रिया सुळे
`मी कुठं जातेयं... इथचं आहे.... माझे फोटो-बिटो झालं काढून... तू कुठे चाललास? थांब इकडं.. फोटो काढू..` असं म्हणत सुप्रिया सुळे, अभिजीत पवार आणि सदानंद सुळे फोटो काढण्यासाठी तयार झाले.
विजय पांढरेंचे ‘पॉवर फुल’ लेटर बॉम्ब!
आपल्या पहिल्या पत्रातून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणणा-या विजय पांढरेंचे आणखी एक `पॉवर`फुल पत्र झी २४ तासच्या हाती लागलंय.