औरंगाबादेत युतीसमोर 'झेडपी' राखण्याचं आव्हान
मराठवाड्याची राजधानी असलेलं औरंगाबाद शिवसेना भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र या बालेकिल्ल्याला गेल्या विधानसभा आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत तडे गेले. आता झेडपी राखण्याचं मोठं आव्हान युतीसमोर आहे.
आघाडीत बिघाडी, कोकणाकडे लक्ष
कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी न होता बिघाडी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसचा कस लागणार आहे.
राष्ट्रवादी उद्या पुन्हा फोडणार एक खासदार!
एका पक्षाचा अध्यक्ष आणि खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणार असून उद्या राष्ट्रवादी राजकीय भूकंप करणार असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी आज सांगलीत केला.
गडचिरोलीत जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम
गेल्या पाच वर्षातल्या कामामुळे तसंच केंद्रात आणि राज्यातही काँग्रेसचं सरकार असल्यामुळं यावेळीही गडचिरोली झेडपीत काँग्रेसची सत्ता येईल असा त्यांच्या नेत्यांना विश्वास वाटत आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी गृहमंत्री आर आर पाटील यांनी घेतली आहे.
जिल्हापरिषदेची धांदल, राष्ट्रवादीत बांदल
मंगलदास बांदल यांनी मंगळवारी अजित पवारांच्या जिजाई बंगल्यावर रात्री साडे अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बांदल यांच्यावर २००६ मध्ये ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मागासवर्गीय जमीन बळकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
झेडपीच्या निवडणुकीची शाळेत दारू पार्टी !
उस्मानाबादमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या व्यंकट गुंड या उमेदवारानं ग्रामस्थांसाठी मटण आणि दारुची पार्टी ठेवली होती. आचारसंहितेची ऐशीतैशी 'झी २४ तास'नं दाखवल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.
औरंगाबादेत युतीला तगडं आव्हान
मराठवाड्याची राजधानी असलेला औरंगाबाद शिवसेना भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र या बालेकिल्ल्याला गेल्या विधानसभा आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत तडे गेले. आता झेडपी राखण्याचं मोठं आव्हान युतीसमोर आहे.
सिंधुदुर्गात ८० मतदान केंद्र संवेदनशील
सिंधुदुर्गात १०४६ पैकी एकूण ८० मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी सर्वाधिक ३३ मतदान केंद्रे कुडाळ तालुक्यात आहेत.
ठाणे झेडपीसाठी राष्ट्रवादीने कंबर कसली
ठाणे जिल्हा परिषदेवर पुन्हा झेंडा फडकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं कंबर कसली आहे. तर राष्ट्रवादीची सत्ता उलथवण्यासाठी युती सरसावली आहे.
आमदार कर्डिलेंचा राजकीय दरबार...
निवडणुकांच्या तोंडावर अटकेत असलेले राजकीय नेतेही सक्रीय झाले आहेत. नगर जिल्ह्यातले राहुरीचे भाजपचे आमदार आणि दोन गुन्ह्यांत आरोपी असलेले शिवाजी कर्डिले निवडणुकांच्या काळात हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.
जळगावमध्ये खडसे X जैन X काँग्रेस
जळगाव जिल्हा हा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला...मात्र गेल्या विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत त्याला तडे जायला सुरूवात झाली. त्यातच खडसे-सुरेश जैन वादामुळं युतीमध्येही तणाव आहे. त्यामुळं आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जैन विरुद्ध खडसे विरुद्ध काँग्रेस आघाडी यांच्यातला सामना रंगणार आहे....
नागपूर झेडपीत भाजप-काँग्रेस टक्कर
राज्याची उपराजधानी असलेलं नागपूर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचं होमपीच...निवडणुक महापालिकेची असो की झेडपीची...तिथंल यशापयश नाही म्हटलं तरी गडकरींच्या खात्यात जमा होतं. त्यामुळंचं भाजपनं नागपूर झेडपीची निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. तर त्याला टक्कर देण्यासाठी दोन्ही काँग्रेस सज्ज झाले आहेत.
सांगलीत पतंगरावांची प्रतिष्ठा पणाला
सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राज्यमंत्रिमंडळातल्या तीन तर केंद्रातल्या एका मंत्र्याची प्रतिष्ठा पणाला लागलीय. जिल्ह्यात युतीची फारशी ताकद नसल्यामुळं दोन्ही काँग्रेसमध्येच खरी लढत होत आहे.
राणेंचा लागणार झेडपीत कस….
सिंधुदुर्गात आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा फड रंगू लागलाय.... जिल्ह्यातले सर्वशक्तीमान नेते नारायण राणेंविरोधात सर्वपक्ष असंच यावेळच्या लढ्याचं स्वरुप असेल.....
अजित दादांच्या वर्चस्वाला सुरूंगाची शक्यता?
पुणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला...जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील सज्ज झालेत. तर युतीनं पवारांचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी कंबर कसलीय.
प्रज्ञा मुंडेंमुळे घराण्यात वाद- पंडित अण्णा
मुंडे घराण्यातील राजकीय भांडण आता वैयक्तिक पातळीवर आलं आहे. मुंडे घराण्यातील वादाला गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे जबाबदार असल्याचा आरोप पंडित अण्णांनी झी २४ तासशी बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.