सचिन तेंडुलकरला रिप्लेस करणार हृतिक!
अभिनेता हृतिक रोशन रविवारी होणाऱ्या इंडियन ग्रांप्री फॉर्म्युला वन रेसच्या सुरवातीला झेंडा दाखविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अश्विनचे प्रमोशन तर हरभजनचे डिमोशन
भारतीय क्रिकेट बोर्डाने २०१२-२०१३ सीझनकरता भारतीय क्रिकेटर्सकरता नव्याने ग्रेडिंग सिस्टीमची घोषणा केली आहे. नव्याने जाहीर झालेल्या ग्रेड लिस्टमध्ये ऑफ स्पिनर हरभजन सिंगची ए ग्रेडमधून बी ग्रेडमध्ये हकालपट्टी करण्यात आली आहे. तर आर. अश्विनची ए ग्रेड कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये वर्णी लागली आहे.
पुस्तक उच्चारणार अंधांसाठी सचिनची गाथा
सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारीत ध्रुवतारा या पुस्तकाच्या ऑडीओ स्वरुपातल्या आवृत्तीचं पुण्यात प्रकाशन झालं. क्रिडा पत्रकार संजय दुधाणे लिखीत ध्रुवतारा पुणे ब्लाइंड स्कुलच्या विद्यार्थ्यांना ऑडीओ बुक स्वरुपात आणलं आहे.
मास्टर ब्लास्टरच्या 'महानायकाला' शुभेच्छा...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आज बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांना ७० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांच्या चांगल्या आरोग्याच्या आणि सुखी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिनच्या मनात निवृत्तीचा विचार
सचिनने क्रिकेटला अलविदा करावं याबाबत माजी क्रिकेटपटू, क्रिकेटपंडित आणि माडिया नेहमीच चर्चा करत असते. मात्र आता खुद्द मास्टर-ब्लास्टरच्या मनातच रिटायर्डमेंटचे विचार सुरू झाले आहेत.
यजमान सचिनच्या घरी ब्रायन लारा
वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने अचानक क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्या घरी जाऊन त्याला भेट देत आश्चर्याचा धक्का दिला. या दोन महान फलंदाजांच्या भेटीचा कार्यक्रम पूर्व नियोजित नसल्याची माहिती समोर आली आहे.
जेव्हा सचिन भेटायला बोलावतो...
तुम्हाला सचिन तेंडुलकरचा फोन आला आणि त्यानं तुम्हाला भेटायला बोलावलं तर...कल्पना करा तुमची काय अवस्था होईल....अहमदनगरच्या चित्रकार आणि शिल्पकार असलेल्या प्रमोद कांबळेंना असाच फोन आला आणि त्यांना सचिननं भेटायलाही बोलावलं... काय झाली असेल त्यांची अवस्था
सचिनवर दबाव टाकू नका - लारा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दबाव टाकू नका. त्याला ज्यावेळी निवृत्ती घ्यायची असेल तेव्हा तो घेईल. सध्या सचिन चागंला खेळत आहे, असे मत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा यांने व्यक्त केले आहे.
फेसबुकवरही सचिनचा विक्रम, एक तासात ४,१०,००० फ्रेंड्स
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने फेसबुकच्या मैदानातही विक्रमी कामगिरी केली आहे. सचिन तेंडुलकर सोमवारी फेसबुकवर दाखल झाला आणि त्याच्या फॅन्सनी या वेळी सगळे विक्रम तोडत सचिन तेंडुलकरला एका तासात ४ लाख १० हजार फ्रेंड रिक्वेस्ट आल्या.
यशात गुरु आणि मित्रांचा वाटा - सचिन तेंडुलकर
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं साधला नाशिककरांशी मनमुराद आनंद. यशामध्ये कुटुंबीय, गुरु आणि मित्रांचा महत्वाचा वाटा असल्याची कबुली दिली. सचिनचा नाशिकमध्ये नागरी सन्मान करण्यात आला. त्यावेळी तो बोलत होता. सचिन तेंडुलकरनं यावेळी दिलखुलास मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. सगळे महत्वाचे निर्णय हे साहित्य सहवासमध्येच घेतल्याचही त्यानं यावेळी सांगितलं.
क्रिकेटचा `देव` का कोपला?
सचिनच्या फॉर्मची चर्चा सध्या रंगत आहे. मात्र यापूर्वी सचिननं अशा चर्चेला आपल्या धावांनी उत्तर दिलं होतं. मैदानावरही त्याची एकाग्रता तो ढळू देत नसे. बेंगळुरु कसोटीत मात्र बाद झाल्यावर सचिन काहीसा रागावलेला दिसला. अनेकजण आता सचिनच्या रागाचं कारण शोधू पहात आहेत.
सचिनच्या खेळावर वयाचा परिणाम – गावस्कर
भारतीय टीमचे माजी कॅप्टन सुनील गावस्करनी सचिनच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह उभ केलं आहे. सचिनच्या खेळावर त्याच्या वयाचा परिणाम होत असल्याचं मत गावस्करांनी यावेळी म्हटलंय.
नवी इनिंग!
एक जगातली महान क्रिकेटर ...तर दुसरी बॉलीवूडमधील एक दिग्गज अभिनेत्री...आपल्या क्षेत्रात त्यांनी वेगळ स्थान निर्माण केल असून आता एका वेगळ्या क्षेत्रात त्यांनी नव्याने पाऊल टाकलंय..देशातील जनतेच्या त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत..
गगनची भरारी, सचिन म्हटला लई भारी!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोमवारी लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल पटकावणाऱ्या शूटर गगन नारंग याला शुभेच्छा दिल्या आहेत. नारंगने देशाचा मान वाढविला असल्याचे सचिनने आपल्या संदेशात म्हटले आहे.
सचिनचे योग्यवेळी पुनरागमन – सेहवाग
श्रीलंकेच्या मालिकेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विश्रांती घेतली असली तरी, तो योग्यवेळी काही ठराविक मालिकांमध्ये पुनरागमन करेल, असे तडकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने सांगितले आहे.
सेहवाग, झहीर करणार टीममध्ये कमबॅक
श्रीलंकेच्या दौ-यासाठी भारतीय टीममध्ये कोण कोणत्या क्रिकेटपटूंना स्थान मिळणार याबाबत सा-यांना उत्सुकता लागली आहे. एशिया कपनंतर भारतीय टीम पहिल्यांदाच कोणत्याही आंतरराष्ट्रीय दौ-यावर जाणार आहे. वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खान टीममध्ये कमबॅक करतील तर सचिन तेंडुलकरच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.
अर्जुनने साधला 'नेम', अंडर १४चा खेळणार 'गेम'?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलगा आता आपली इनिंग सुरू करणार आहे. अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या अंडर १४ च्या संघात वर्णी लागली आहे. संभाव्य संघात सामिल करण्यात आले असून प्रशिक्षण शिबिरात ज्युनिअर तेंडुलकर सराव करीत आहे.
एक 'विनम्र' खासदार...
तोंडानं वायफळ बडबड करण्यापेक्षा आपल्या कृतीला महत्त्व देणाऱ्या सचिन तेंडुलकरनं राज्यसभेतही आपली विनम्रता कायम ठेवणार असल्याचं सागितलंय.
राहुल गांधीचे शेजारी होण्यास सचिनचा नकार
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खासदारकीची शपथ घेतल्यानंतर दिल्लीत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा शेजारी होण्याच्या हालचाली सुरू केली होती. मात्र, सचिन तेंडुलकरने आपल्याला हा बंगला नको, असे स्पष्ट केले. त्यामुळे राहुल गांधी यांचा शेजारी होण्याची शक्यता आता मावळली आहे.
राहुल गांधीच्या ‘घर के सामने’ सचिनचा बंगला
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खासदारकीची शपथ घेतल्यानंतर आता तो दिल्लीत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा शेजारी होण्याची शक्यता आहे. खासदार म्हणून सचिनला देण्यात येणारा बंगला हा राहुल गांधीच्या बंगल्यासमोरच असणार आहे, त्यामुळे सचिन- राहुल शेजारी होणार असल्याची चर्चा सध्या दिल्लीत आहे.