नरेंद्र मोदीच गुजरातच्या गादीवर

गुजरातमधील जनतेने मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे मोदी सलग तिसऱ्यांदा गुजरातच्या गादीवर बसण्यास मोकळे झाले आहेत. मणिनगरमधून मोदींनी तर त्यांचे समर्थक नारणपुरामधून अमित शहा विजयी झाले आहेत. गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा सत्ता आपल्या हाती ठेवण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 20, 2012, 11:39 AM IST

www.24taas.com, अहमदाबाद

गुजरातमधील जनतेने मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे मोदी सलग तिसऱ्यांदा गुजरातच्या गादीवर बसण्यास मोकळे झाले आहेत. मणिनगरमधून मोदींनी तर त्यांचे समर्थक नारणपुरामधून अमित शहा विजयी झाले आहेत. गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा सत्ता आपल्या हाती ठेवण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
मात्र, भाजपच्या काही जागा कमी झाल्याने जनतेने सत्तेच्या चाव्या हाती दिल्या असतानाच चिंतन करण्यास भाग पाडले आहे. काँग्रेसनेही यावेळी अपेक्षेपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. तर माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या गुजरात परिवर्तन पक्षामुळे (भाजप) काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना फटका बसल्याचे चित्र दिसून आले आहे.
नरेंद्र मोदी यांच्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष गुजरात निकालाकडे लागले होते. मोदींना भरघोस यश मिळवीत, असा होरा होता. मात्र, तो फोल ठरला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदासाठी त्यांची होणारी बळकट दावेदारी या निवडणुकीने कमी झाली आहे. मोदींनी ‘हॅट्ट्रिक` साधली आहे. त्यामुळे चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास मोदी आता मोकळे झाले आहेत.

यंदाच्या निवडणुकीत मोदींकडे तसा ठोस कोणताही मुद्दा नव्हता. त्यांनी सुरवातीला विकास आणि सुशासनावर भर दिला. नंतर त्यांनी ‘यूपीए` सरकार निधी देताना गुजरातवर अन्याय करत असल्याच्या मुद्द्याला हवा देण्याचा प्रयत्न केला आणि राजकीय वातावरण तापले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या मुद्द्यावर जोरदार हरकत घेत मोदींना चोख प्रत्युत्तर दिले. सोनिया गांधी यांनी करिष्मा गुजरातमध्ये थोड्याप्रमात चालला. त्यामुळे काँग्रेसच्या काही जागा वाढल्या आहेत.