अडवाणींची नरेंद्र मोदींनी मागितली माफी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीची सर्व सूत्र राजनाथसिंग यांनी दिल्यानंतरच दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आणि भाजपमध्ये भूकंप घडवून आणला. त्यानंतर नाट्यमय घडामोडींना वेग आला. मोदी यांनी आपले राजकीय गुरू अडवाणी यांनी माफी मागितली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 11, 2013, 12:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीची सर्व सूत्र राजनाथसिंग यांनी दिल्यानंतरच दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आणि भाजपमध्ये भूकंप घडवून आणला. त्यानंतर नाट्यमय घडामोडींना वेग आला. मोदी यांनी आपले राजकीय गुरू अडवाणी यांनी माफी मागितली.
लालकृष्णु अडवाणी यांनी आपल्या तिन्ही पदाचे राजीनामे दिल्यानंतर भाजपमध्ये चलबिचल सुरू झाली. मात्र, पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंग यांनी त्यांचे राजीनामे नामंजूर केलेत. मोदींना पक्षात जास्तच महत्व देण्यात येत असल्याने अडवाणी जास्त दुखावले गेलेत. त्यांनी वेळोवेळी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. मात्र, पक्षाने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अडवाणींना पक्षामध्ये निर्णय प्रक्रियेत डावल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे अडवाणींनी हे टोकाचे पाऊल उचल्याचे सांगितले जात आहे.
अडवाणी यांचे मनवळविण्यासाठी प्रयत्न काय करणार, असा सवाल काही पत्रकारांनी राजनाथसिंग यांना केला असता त्यांनी याबाबत मौन बाळगले. त्यामुळे पक्षाची काय भूमिका आहे, याबाबत संभ्रम आहे. त्याचवेळी विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी अडवाणींशी बोलणार असल्याचे स्पष्ट केले. असे असताना नरेंद्र मोदी यांनी माझे काही चुकले असले तर अडवाणी मला माफ करतील, असे म्हणत त्यांची माफी मागितली. मोदींनी सांगितले की, अडवाणींशी फोनवर सविस्तर चर्चा झाली. मी त्यांना त्यांचा निर्णय बदलण्यास सांगितला आहे. मला आशा आहे की, ते आपला निर्णय मागे घेतील. ते लाखो कार्यकर्त्यांना नाराज करणार नाहीत.

दरम्यान, शत्रुघ्न. सिन्हाक यांनी चिंता व्यक्त केली आहे. अडवाणींच्या राजीनाम्यामुळे धक्का बसल्याचे सिन्हा यांनी म्हटले. ज्यांच्यामुळे राजीनामा द्यावा लागल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. पक्षाने तात्काळ याबाबत तोडगा काढला नाही तर भाजपमध्ये आणखी राजीनामा नाट्य पाहायला मिळेल, अशी भीती व्यक्त केलेय.
दिल्ली एका ठिकाणी कार्यर्त्यांने अडवाणी यांच्या राजीनामा पत्राचे पोस्टर लावले आहे. त्यामुळे पक्षात अधिकच अस्वस्था निर्माण झाली आहे. यात म्हटले आहे की, अडवाणी यांना का राजीनामा दिलाय ते जाणून घ्या. तर दुसरीकडे संघ प्रमुख मोहन भागवत यांनी अडवाणी यांचा राजीनामा हा दुर्भाग्यपूर्ण बाब असल्याचे प्रतिक्रिया दिलेय. यामुळे भाजपचे नुकसान होण्याची चिंता व्यक्त केलेय. तर एनडीएमधील घटक पक्षांमधील प्रमुख नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एनडीएवर याचे पडसाद उमटतील असे म्हटलेय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.