अमित शाह भाजपचे नवे अध्यक्ष? उद्या नावाची घोषणा

भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची उद्या बैठक होणार असून या बैठकीत अमित शाह यांची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे.

Updated: Jul 8, 2014, 11:51 AM IST
अमित शाह  भाजपचे नवे अध्यक्ष? उद्या नावाची घोषणा title=

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची उद्या बैठक होणार असून या बैठकीत अमित शाह यांची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे.

मोदी यांच्या खास जवळचे आणि भाजपचे महासचिव शाह यांच्याकडे भाजपची सूत्रे देण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शाह हे नव्याने भाजपचे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.

शाह यांना जवळपास अध्यक्ष बनविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यांच्या नावावर एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत दुपारी १२ वाजता अमित शाह यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी यांचे जवळेच आणि विश्वासू शाह यांनी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात पक्षाला चांगले यश मिळवून दिले. यामध्ये शाह यांचा मोलाचा वाटा आहे. विद्यमान अध्यक्ष राजनाथ सिंग यांना केंद्रात महत्वाचे मंत्रीपद देण्यात आल्याने त्यांची जागा शाह घेण्याची शक्यता आहे. शाह यांचे अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.