चलनातून 500 आणि 1000च्या नोटा मध्यरात्रीपासून रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. आज रात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्यात आल्या आहे. यापुढे ही दोन्ही नोटा चलनातून बंद झाल्या आहेत.

Updated: Nov 8, 2016, 09:19 PM IST
चलनातून 500 आणि 1000च्या नोटा मध्यरात्रीपासून रद्द title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. आज  मध्य रात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्यात आल्या आहे. यापुढे ही दोन्ही नोटा चलनातून बंद झाल्या आहेत.

आज मध्यरात्रीपासून, म्हणजेच ८ नोव्हेंबरच्या १२ वाजल्यापासून ५०० रुपये आणि १००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द करण्यात आल्या आहेत. तशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली. या निर्णयामुळे आज मध्यरात्रीनंतर ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांची किंमत केवळ कागदाचा तुकडा म्हणून राहणार आहे.

ज्यांच्याकडे ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा असतील, त्यांनी १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या आपल्या खात्यात जमा कराव्यात, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी नागरिकांना केले आहे.

- चेक, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्डद्वारे होणारे व्यवहार सुरळीत असणार, त्यावर निर्बंध नाही
- पाचशे-हजार रुपयांच्या नोटांच्या सहाय्याने काही मोजक्या महत्त्वाच्या ठिकाणी, व्यवहार करण्यासाठी ११ नोव्हेंबरपर्यंत मुदत
- रुग्णांना डॉक्टरांच्या प्रिस्किपशनवर ५००-हजार रुपयांच्या नोटांवर व्यवहार करता येतील, औषधे मिळतील, तसे मोदीं यांनी जाहीर केले आहे.

तुमच्याकडे  नोटा असतील तर तुम्ही काय कराल?

- 10 ते 24 नोव्हेंबर 4 हजार रुपये बॅंकेतून किंवा एटीएममधून काढता येणार
- 15 दिवसांपासून याची मुदत वाढ
- 31 डिसेंबर 2016 पर्यंत नोटा बदलून मिळणार आहेत.
- 31 डिसेंबरनंतर थेट रिर्झव्ह बॅंकेत नोटा बदलाव्या लागतील.
 - उद्या बॅंका बंद, एटीएम  9 नोव्हेंबर आणि 10 नोव्हेंबर या दोन दिवशी बंद राहणार
- बॅंक तसेच एटीएममधून प्रतिदिन 2000 रुपये काढू शकता.
- बॅंकेत पैसे जमा करताना तुमच्याकडे पॅन नंबर, मतदान कार्ड किंवा आधार कार्ड बंधनकारक असणार आहे.

- 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत 500 आणि 1000च्या नोटा बदली करु शकतो.

- 8 नोव्हेंबर 2016च्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 रुपयांचे नोटा बंद करणार 
- मध्यमवर्गीय व्यक्ती भ्रष्टाचारामुळे घर खरेदी करू शकत नाही 
- भ्रष्टाचाराचा फटका गरिबांना बसतो आहे
- देशात 500 ते 1000 च्या नोटांचा वापर 80 ते 90 टक्क्यांपर्यंत वाढला आहे 
- दहशतवाद आणि बनावट नोटांच्या विरोधात लढाई व्हायला हवी 
- भ्रष्टाचा-यांकडून सव्वा लाख कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर आला आहे 
- काळा पैसा परत आणण्यासाठी कायदा कडक केला 
- दहशतवाद आणि बनावट नोटांच्या माध्यमातून भ्रष्टाचार सुरू आहे 
- नवी दिल्ली - बनावट नोटांच्या माध्यमातून भ्रष्टाचार सुरू होता 
- नवी दिल्ली - भ्रष्टाचार देशात वा-यासारखा पसरतो आहे 
- नवी दिल्ली- देशात भ्रष्टाचार आणि काळा पैसा बोकाळलाय 
- नवी दिल्ली- गरिबांच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या 
- नवी दिल्ली- सरकार गरिबांसाठी समर्पित आहे  - पंतप्रधान नरेंद्र मोदी