मोदींवर निर्णय द्यायला मी काही जज नाही : सल्लूमियाँ

नुकतीच, गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी अभिनेता सलमान खान यांची नुकतीच झालेली भेट बरीच गाजली होती.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 21, 2014, 11:55 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नुकतीच, गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी अभिनेता सलमान खान यांची नुकतीच झालेली भेट बरीच गाजली होती. याचसंबंधी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना सलमाननं `मोदींना सीबीआय आणि कोर्टानं क्लीनचीट दिलीय, तर ही गोष्ट तिथेच संपते... मी काही जज नाही, जो मोदींबद्दल काही निर्णय देऊ... मग, मी मोदींची भेट घेतली तर त्यात एवढं हंगामा करण्याचं काय कारण आहे` असं म्हटलंय.
`नरेंद्र मोदी एक चांगले पंतप्रधान होऊ शकतील का?` या प्रश्नावर सलमानचं उत्तर होतं `याचा निर्णय घेणं हे काही माझं काम नाही`. यावेळी, आपल्याला नरेंद्र मोदींसोबत पतंग खेळण्यात खूप मज्जा आली असंही, सलमाननं म्हटलंय.
उत्तरप्रदेशातील सैफई महोत्ववात सहभागी होण्यावरूनही वादंग उठला होता. यावर सलमान म्हणतोय की, कुणालाही त्याचं नैतिक जबाबदारी सांगण्याची गरज नाही.
यापूर्वी, सलमाननं मोदींची भेट घेतल्यानंतर त्यांची भरपूर स्तूती केली होती. गुजरातच्या विकासासाठी नरेंद्र मोदींवर त्यानं स्तुतीसुमनं उधळली. पण, यावेळ भावी मुख्यमंत्री म्हणून सरळसरळ मोदींचं नाव घेणं त्यानं टाळत `एखाद्या चांगल्या व्यक्तीनंच पंतप्रधान व्हावं` असं त्यानं म्हटलं होतं. पण, यावेळी लोकसभा निवडणुकीत आपलं मत मात्र काँग्रेसलाच असेल, असंही त्यानं स्पष्ट केलं होतं.
आपला आगामी सिनेमा `जय हो`च्या प्रचारादरम्यान अहमदाबादमध्ये सलमाननं घाटलोडियामध्ये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या `पतंगोत्सवात` सलमान मोदींसोबत सहभागी झाला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.