दिल्लीतही महापुरुषांच्या जयंती-पुण्यातिथीला शाळांच्या सुट्या रद्द

उत्तरप्रदेश सरकारच्या पावलावर पाऊल टाकून दिल्ली सरकारनंही महापुरुषांच्या जयंती-पुण्यातिथीला शाळांना असलेल्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनीच ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

Updated: Apr 28, 2017, 11:38 PM IST
दिल्लीतही महापुरुषांच्या जयंती-पुण्यातिथीला शाळांच्या सुट्या रद्द

नवी दिल्ली : उत्तरप्रदेश सरकारच्या पावलावर पाऊल टाकून दिल्ली सरकारनंही महापुरुषांच्या जयंती-पुण्यातिथीला शाळांना असलेल्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनीच ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

तसंच सुट्या रद्द करण्याचा निर्णय सर्वप्रथम घेतल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तुतीही केली आहे.