महिलेला जादूटोणा करणारी म्हणून गँगरेप, गुप्तांगात टाकल्या लोखंडी सळ्या

मध्य प्रदेशाच्या शिवपुरीमध्ये राक्षस आणि जादू-टोना करण्याचा आरोप करत एका आदिवासी महिलेवर तीन दिवस सहा जणांनी गँगरेप केला. एवढंच नव्हे तर रविवारी महिलेच्या गुप्तांगात आरोपींनी लोखंडी सळ्या टाकल्या आणि तीला गंभीर जखमी केलं. 

Updated: Jun 2, 2015, 09:08 AM IST
महिलेला जादूटोणा करणारी म्हणून गँगरेप, गुप्तांगात टाकल्या लोखंडी सळ्या

रायपूर: मध्य प्रदेशाच्या शिवपुरीमध्ये राक्षस आणि जादू-टोना करण्याचा आरोप करत एका आदिवासी महिलेवर तीन दिवस सहा जणांनी गँगरेप केला. एवढंच नव्हे तर रविवारी महिलेच्या गुप्तांगात आरोपींनी लोखंडी सळ्या टाकल्या आणि तीला गंभीर जखमी केलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, घटना शिवपुरीपासून जवळपास ५५ किलोमीटर दूर कॅमरारा गावातील आहे. माहिती मिळतास पोलीस निरीक्षक मोहम्मद युसुफ कुरेशीसह पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून पीडित महिलेला ग्वाल्हेरच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलंय.

एसडीओपी रामराज सिंह तोमर यांनी सांगितलं की महिलेला गंभीर परिस्थितीत सोमवारी सकाळी जिल्हा हॉस्पिटलमध्ये भर्ती केलं गेलं. इथं प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी तिला ग्वाल्हेरला पाठवलं गेलं. सर्व आरोपींना आयपीसी कलम ३७६ (जी) (२) सह इतर संबंधित कलमांअंतर्गत अटक केलीय.

माहिती मिळालीय की, कॅमरारा गाावत आदिवासींच्या दोन वस्त्या आहेत. यातील एका वस्तीत चाळीस वर्षीय पीडित महिला राहत होती. तिचा पती सहा महिन्यांपूर्वी गुजरातला मजदूरीसाठी गेला. ती आपल्या सहा वर्षीय मुलीसोबत गावात राहायची. काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी महिलेवर चेटकीन असल्याचा आरोप करून तीला गावाबाहेर काढलं. वस्तीच्या बाहेर ती झोपडी बनवून सध्या राहत होती. २९ मे रोजी सहा जणांनी तीला जबरदस्तीनं गावात आणलं आणि ३१ मे पर्यंत तिच्यावर गँगरेप केला. 

यादरम्यान एका गावकऱ्यानं पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी पोहोचून महिलेला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं आणि आरोपींना अटक केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.