www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
घर खरेदी करण्याचा प्लान असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. नवे गृहनिर्माण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गृह कर्जावरील व्याज दरांमध्ये कपात करण्यात येईल, अशी आशा व्यक्त केलीय.
नुकताच नायडू यांनी आपल्या पदाचा कारभार हातात घेतलाय. 2020 पर्यंत भारतातील प्रत्येक नागरिकाला घर मिळण्याचं मोदी सरकारचं लक्ष्य असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. सगळ्यांना घरं उपलब्ध करून द्यायची असतील तर गृहकर्जावरील व्याज दर कमी करण्याची गरज आहे.
अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली गेल्या वेळी एनडीए सरकारनं व्याज दर 10.5 टक्क्यांवरून 7.5 टक्क्यांपर्यंत खाली आणले होते. आता पुन्हा गृह कर्जाचे व्याजदर 10 टक्क्यांपेक्षा अधिकच पाहायला मिळत आहेत. याबद्दल आपण अर्थमंत्र्यांसोबतच चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
यावेळी त्यांनी `जेएनएनआरयूआरएम` योजनेलाही नवं रूप देणार असल्याचं म्हटलंय. शहरी विकास मंत्रालय देशात 100 शहर विकसित करण्यासाठी काम करणार असल्याचं भाजपच्या घोषणापत्रातही म्हटलं गेलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.