अरविंद केजरीवाल मंत्रिमंडळानं घेतली शपथ

जनलोकपाल विधेयकावरून आजपासून बरोबर वर्षभरापूर्वी मुख्यमंत्रीपदावरून राजीनामा देणाऱ्या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय.

Updated: Feb 14, 2015, 06:45 PM IST
अरविंद केजरीवाल मंत्रिमंडळानं घेतली शपथ title=

नवी दिल्ली : जनलोकपाल विधेयकावरून आजपासून बरोबर वर्षभरापूर्वी मुख्यमंत्रीपदावरून राजीनामा देणाऱ्या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. रामलीला मैदानात केजरीवाल मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. 

दुपारी १२.३४ वाजता

- राष्ट्रगीतानं  शपथविधी सोहळ्याचा समारोप

दुपारी १२.२० वाजता

- मनिष सिसोदिया यांनी घेतली शपथ  
- सिसोदिया केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी

- असीम अहमदखान यांनी घेतली शपथ
- मटिया महल मतदारसंघातून विजयी
- युवा नेता म्हणून असीम यांना मंत्रिमंडळात स्थान
- केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात पाच सदस्य असून एका मुस्लिम उमेदवाराला दिलं स्थान

- संदीप कुमार यांनी घेतली शपथ
- सुल्तानपूर माजरा मतदारसंघातून विजयी
- कायद्याचे पदवीधर
- महिला व बाल कल्याण खातं मिळण्याची शपथ

- सत्येंद्र कुमार जैन यांनी घेतली शपथ
- शकुरबस्तीमतदारसंघातून विजयी
- ४९ दिवसांच्या केजरीवाल यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री
- आरोग्य आणि उद्योग खातं मिळण्याची शक्यता
- व्यवसायाने आर्किटेक्ट 

- गोपाल राय यांनी घेतली शपथ
- बाबरपूर मतदारसंघातून विजयी
- सामाजिक कार्येकर्ता आणि वक्त म्हणून ओळख
- परिवहन आणि कामगार कल्याण खातं मिळण्याची शक्यता

- जितेंद्र सिंग तोमर यांनी घेतली शपथ
- त्रिनगरमतदारसंघातून विजयी
- केजरीवाल यांचे विश्वासू
- वकिली सोडून राजकारणात आले
- विधी आणि न्याय खातं मिळण्याची शक्यता

दुपारी १२.१५ वाजता
- केजरीवाल मंत्रिमंडळाच्या शपथविधीला सुरुवात
- अरविंद केजरीवाल यांनी घेतली  मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ.... दिल्लीचे आठवे मुख्यमंत्री

सकाळी ११.५० वाजता

- अरविंद केजरीवाल रामलीला मैदानावर दाखल
- मनीष सिसोदियादेखील उपस्थित
- अरविंद केजरीवाल आपल्या मंत्र्यांसोबत घेणार गोपनीयतेची शपथ 

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांचा आज शपथविधी होत आहे. रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आलाय.

अरविंद केजरीवाल यांच्यासह मनिष सिसोदिया, एस. के. जैन, जितेंद्र तोमर, असीम अहमद, संदीप कुमार आणि गोपाल राय हेही शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
 
अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात संभाव्य चेहरे कोण असतील, पाहूयात... 

  • मनीष सिसोदिया, उपमुख्यमंत्री, शिक्षण, पीडब्ल्यूडी 

  • सत्येंद्र जैन, आरोग्य, उद्योग

  • जितेंद्र तोमर, कायदेमंत्री

  • संदीप कुमार,  महिला व बालविकास मंत्री

  • गोपाल राय, परिवहन आणि कामगारमंत्री

  • असीम अहमद खान, अन्न व नागरी पुरवठामंत्री

रामलीला मैदानावर आज पुन्हा अरविंद केजरीवाल एका वर्षांनंतर शपथ घेणार आहेत. रामलीला मैदानावर शपथविधीची तयारी पूर्ण झाली असून कडेकोट सुरक्षाव्यवस्थाही ठेवण्यात आलीय. दुसरीकडे शपथविधीसाठी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रामलीला मैदानावर येण्यास सुरुवात झालीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.