मोदी सरकारचं भारतात लवकरच 'स्वच्छ इंटरनेट'

 देशात सध्या 'स्वच्छ भारत' अभियान जोरात सुरू असतांना,  पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार 'स्वच्छ इंटरनेट' करणार आहे.

Updated: Nov 20, 2014, 08:09 PM IST
मोदी सरकारचं भारतात लवकरच 'स्वच्छ इंटरनेट' title=

नवी दिल्ली :  देशात सध्या 'स्वच्छ भारत' अभियान जोरात सुरू असतांना,  पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार 'स्वच्छ इंटरनेट' करणार आहे.

सरकार पॉर्न वेबसाइट असलेल्या संकेतस्थळांची यादी तयार करणार आहे. ती यादी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर्सकडे देण्यात येईल आणि हे संकेत स्थळ भारतात बंद करण्यात येतील.

दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, देशात इंटरनेटचा वेग वाढविण्यासाठीही सरकार काम करणार आहे. इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया तशा सूचना देण्यात येणार आहेत.  परदेशात पॉर्न वेबसाइटला मान्यता आहे. परंतु, भारतीय संस्कृती जपण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

'भारतीय संस्कृतीमध्ये पॉर्न वेबसाइट बसत नाहीत. संकेतस्थळांवर असलेले पॉर्न मजकूर काढणे गरजेचे आहे. परंतु, पॉर्न वेबसाइट बंद करणे सरकारसाठी अवघड काम आहे. जगभरात एकूण 40 मिलियन पॉर्न वेबसाइट असून, या भारताबाहेरून चालत आहेत, असे भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अरविंद गुप्ता यांनी एका संकेतस्थळाशी बोलताना सांगितले. 

दरम्यान, पॉर्न वेबसाइट बंद करण्याविषयीची याचिका वकील कमलेश वासवानी यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.