दिल्लीत 'पाकिस्तान एअरलाइन्स'ची तोडफोड

हिंदू सेनेच्या सदस्यांनी दिल्लीत तोडफोड केली असल्याचं सांगण्यात येत आहे. बाराखंबा रोडवरील पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या कार्यालयात घुसून काहीजणांनी हल्ला केला. या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. 

Updated: Jan 14, 2016, 10:41 PM IST
दिल्लीत 'पाकिस्तान एअरलाइन्स'ची तोडफोड title=

नवी दिल्ली : हिंदू सेनेच्या सदस्यांनी दिल्लीत तोडफोड केली असल्याचं सांगण्यात येत आहे. बाराखंबा रोडवरील पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या कार्यालयात घुसून काहीजणांनी हल्ला केला. या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. 

नवी दिल्लीचे पोलिस उपायुक्त नारवाल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला, तसेच याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. दुपारच्या वेळी ही घटना घडली, तेव्हा पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.