नवी दिल्ली : राजधानीत गेल्या काही दिवसांत पसरलेल्या विषारी वायुमुळे आज सुमारे 1800 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दिवाळी आणि वाहनांच्या प्रदूषणानंतर दिल्ली काळ्या धुराची चादर दिसत आहे. हवेतील वायूमुळे नागरिकांना श्वास घेणेही अवघड झाले आहे. यामुळे दिल्लीतील सर्व सरकारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दिल्लीच्या इतिहासातील हे 17 वर्षांतील सर्वांत धोकादायक प्रदूषण आहे. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. दिल्लीच्या हवेत प्रदूषणाच्या पातळीत सतत वाढ होत आहे.
राष्ट्रीय हरित लवादानेही दिल्ली सरकारला या मुद्द्यावरुन चांगलेच झापले. प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे आदेश लवादाने दिलेत.