www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
रेल्वेमधून दूरवरचा प्रवास करताना तुम्ही बोअर होऊन जाता... रेल्वे प्रशासनाच्याही ही गोष्ट आता लक्षात आलीय. त्यामुळेच रेल्वे प्रशासनानं आता तुमच्या प्रवासादरम्यान मनोरंजनाची काळजी घेण्याचा निर्णय घेतलाय.
आता, प्रवासादरम्यान तुम्ही लाईव्ह मॅचही पाहू शकणार आहात. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सुविधा सुरुवातीला दिल्लीहून सुटणाऱ्या शताब्दी ट्रेन्समध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये शताब्दी ट्रेन्समध्ये प्रत्येक सीटच्या पाठिमागे एक एलसीडी टीव्ही लावण्यात येणार आहे. या टीव्हीवर प्रवाशांना ८० पेक्षा जास्त चॅनल्स पाहता येतील. याशिवाय हेडफोन लावून म्युझिकची मजा लुटता येईल.
पायलट प्रोजेक्ट अंतर्गत ही सुविधा दिल्लीहून निघणाऱ्या कालका-शताब्दीमध्ये यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आलीय. आता, ही सुविधा लखनऊ शताब्दी, कालका शताब्दी, अमृतसर शताब्दी, कानपूर शताब्दी, अजमेर, भोपाळ आणि देहरादून शताब्दीमध्ये ही सुविधा दिली जाईल. २९ एप्रिल पर्यंत हे पोजेक्ट फायनल होईल. त्यानंतर काही दिवसांनी लगेच ही सुविधा सुरू करण्यात येईल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.