पाक सैनिकांना चीनकडून धडे! सीमेलगत हालचाली वाढल्या

भारतीय सीमेत वारंवार घुसखोरी करणारा कुरापतखोर चीन आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिकांना शस्त्र प्रशिक्षण देत असल्याचं वृत्त आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरीजवळ असलेल्या पाकव्याप्त काश्मिरातील काही चौक्यांमध्ये हे प्रशिक्षण दिलं जात असल्याचा अहवाल सीमा सुरक्षा दलानं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना सादर केल्याचं वृत्त आहे.

PTI | Updated: Nov 16, 2014, 09:43 AM IST
पाक सैनिकांना चीनकडून धडे! सीमेलगत हालचाली वाढल्या title=

ब्रिस्बेन: भारतीय सीमेत वारंवार घुसखोरी करणारा कुरापतखोर चीन आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिकांना शस्त्र प्रशिक्षण देत असल्याचं वृत्त आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरीजवळ असलेल्या पाकव्याप्त काश्मिरातील काही चौक्यांमध्ये हे प्रशिक्षण दिलं जात असल्याचा अहवाल सीमा सुरक्षा दलानं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना सादर केल्याचं वृत्त आहे.

राजौरी सेक्टरला लागून असलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या पाकव्याप्त ब्रिगेड भागातील काही पाकिस्तानी चौक्यांमध्ये चिनी लष्करी प्रशिक्षक पाकिस्तानी सैनिकांना शस्त्र प्रशिक्षण देत आहेत, असं या अहवालात म्हटलं आहे. तथापि चिनी प्रशिक्षक पाकिस्तानी सैनिकांना नेमक्या कोणत्या शस्त्रांचं प्रशिक्षण देत आहेत, याचा तपशील मात्र या अहवालात दिलेला नाही.

पाकिस्तानी रेंजर्स आंतरराष्ट्रीय सीमेवरील काही प्रमुख चौक्यांचा ताबा पाकिस्तानी लष्करी युनिटकडे सोपवित आहेत आणि तिथं बंदुका, उखळी तोफा आणि स्निपिंग उपकरणं तैनात करण्यात येत आहेत. याशिवाय राजौरी सेक्टरला लागून असलेल्या ३ पीओके ब्रिगेड आणि कोटली भागात पाकिस्तानी तोफखान्याचे सैन्य कोट कटेरालगत ८५६ मुजाहिदीनसोबतच ८ सिंधचं सैन्य तैनात केलेलं आहे. 

अलीकडच्या काळात पंजाबच्या अबोहर आणि गुरुदासपूर जिल्ह्यांना लागून असलेल्या सीमेच्या पलीकडे पाकिस्ताननं अनेक नवे टेहळणी मनोरे उभे केल्याचंही निदर्शनास आल्याचंही या अहवालात नमूद केलं गेलं आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.