www.24taas.com, झी मीडिया, इराण
सध्या स्मार्टफोनचा जमाना असून मोबाईलवर `व्हॉट्सअॅप धुमाकूळ घालत असले तरी या अॅपवर एका देशाने चक्क बंदी घातली आहे. लोकांमध्ये आणि खासकरून तरूणांमध्ये `व्हॉट्सअॅप` अधिक लोकप्रिय आहे. असे असताना इराण देशाने मात्र बंदी घातली आहे. `व्हॉट्सअॅप`चा वापर हा फ्री मॅसेजेस पाठवण्यासाठी होतो. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांच्या जातीलाच या बंदीसाठी ग्राह्य धरण्यात आलं आहे.
फेब्रुवारी महिन्यातच फेसबुकने `व्हॉट्सअॅप` ही सर्व्हिस 19 बिलियन डॉलरला खरेदी केली होती. या कारणाने `व्हॉट्सअॅप`वर आता मार्क झुकेरबर्गचा हक्क आहे आणि झुकेरबर्ग हा अमेरिकेतील ज्यू वंशाचा आहे.
इराणच्या एका वृत्तपत्राच्या दाव्यानूसार, मार्क झुकेरबर्ग हे ज्यू वंशाचे असल्याने इराणने `व्हॉट्सअॅप` अॅप्लिकेशनवर बंदी घातली आहे. इराणच्या सायबर क्राईम सेलमध्ये एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीचे सचिव अब्दोलस्मद खोरामाबडी यांनी हा बंदीचा निर्णय जाहीर केला. इराणमध्ये 2009 पासूनच फेसबुक आणि ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईड्सवर बंदी घातली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.