'बाहुबली'ने सलमान, शाहरुखचा रेकॉर्ड तोडला

बॉलिवूडमधील सगळ्यात बजेट असलेला सिनेमा बाहुबलीला पहिल्याच दिवशी ग्रॅंड ओपनिंग मिळालय. सिनेमाला पहिल्याच दिवशी  ६० कोटींची बंपर ओपनिंग मिळाली असून बाहुबलीने आजवरचे सगळेच रेकॉर्ड तोडलेय.

Updated: Jul 11, 2015, 07:32 PM IST
'बाहुबली'ने सलमान, शाहरुखचा रेकॉर्ड तोडला title=

मुंबई : बॉलिवूडमधील सगळ्यात बजेट असलेला सिनेमा बाहुबलीला पहिल्याच दिवशी ग्रॅंड ओपनिंग मिळालय. सिनेमाला पहिल्याच दिवशी  ६० कोटींची बंपर ओपनिंग मिळाली असून बाहुबलीने आजवरचे सगळेच रेकॉर्ड तोडलेय.

सिनेमा तेलगू आणि हिंदी भाषेत रिलीज झाला असून साऊथ सुपरस्टार प्रभास आणि तनन्ना भाटिया यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. अभिनेता सलमान खान, शाहरुख खान यांच्याही सिनेमाला पहिल्याच दिवशी कमाई करता आली नाही.

एस.एस.राजमौली दिग्दर्शित हा सिनेमा जवळपास ४२०० थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला असून भारतातील सर्वाधिक ओपनिंग मिळालेला सिनेमा ठरला आहे. आठवडाभरात हा सिनेमा १०० कोटी रुपयांचा गल्ला जमवू शकतो. तर अमेरिकेत १५ कोटी रुपयांचा गल्ला जमवलाय. त्यामुळे सिनेमाला वाढता प्रतिसाद पाहाता अनेक रेकॉर्ड मोडेल असे सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.