रणबीरच्या 'त्या' कमेंटमुळे बच्चन कुटुंबिय नाराज

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने ऐश्वर्यासोबतच्या बोल्ड सीन्सवर मौके पे चौका या कमेंटवर बच्चन कुटुंबिय चांगलेच नाराज झालेत. 

Updated: Oct 31, 2016, 11:24 AM IST
रणबीरच्या 'त्या' कमेंटमुळे बच्चन कुटुंबिय नाराज

मुंबई : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने ऐश्वर्यासोबतच्या बोल्ड सीन्सवर मौके पे चौका या कमेंटवर बच्चन कुटुंबिय चांगलेच नाराज झालेत. 

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान रणबीरने ऐश्वर्यासोबतच्या बोल्ड सीन्सवर भाष्य केले होते. ऐश्वर्यासोबतचे तसे सीन्स शूट करताना आपण सुरुवातीला खूप घाबरलो होतो मात्र ऐश्वर्याने योग्य सल्ला दिल्यानंतर विचार केला अशी संधी पुन्हा मिळणार नाही त्यामुळे मौके पे चौका मारला असे विधान मुलाखतीत केले होते.

रणबीरच्या या विधानाने मात्र बच्चन कुटुंबियांनी चांगलीच नाराजी व्यक्त केलीये. बच्चन कुटुंबातील अनेक जण बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आहेत. त्यामुऴे तेथे कसे काम असते याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. चित्रपटातील ऐश्वर्या आणि रणबीरच्या त्या सीन्सबद्दल त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. मात्र रणबीरच्या या विधानाने मात्र त्याने बच्चन कुटुंबियांची नाराजी ओढवून घेतलीये.