फिल्म रिव्ह्यू : तब्बूसाठी 'फितूर' पाहायलाच हवा!

'रॉक ऑन' आणि 'काय पो छे'नंतर दिग्दर्शक अभिषेक कपूर यांचा फितूर आज बिग स्र्किनवर पहायला मिळतोय. 'ग्रेट एक्सपेक्टेशन्स' या कादंबरीवर आधारीत हा सिनेमा आहे.  

Updated: Feb 12, 2016, 01:45 PM IST
फिल्म रिव्ह्यू : तब्बूसाठी 'फितूर' पाहायलाच हवा! title=

सिनेमा : फितूर

दिग्दर्शक : अभिषेक कपूर

निर्माता : सिद्धार्थ रॉय कपूर, अभिषेक कपूर

संगीत : अमित त्रिवेदी

कलाकार : तब्बू, आदित्य रॉय कपूर, कतरिना कैफ

वेळ : १२९ मिनिटे

जयंती वाघधरे, मुंबई : 'रॉक ऑन' आणि 'काय पो छे'नंतर दिग्दर्शक अभिषेक कपूर यांचा फितूर आज बिग स्र्किनवर पहायला मिळतोय. 'ग्रेट एक्सपेक्टेशन्स' या कादंबरीवर आधारीत हा सिनेमा आहे. कतरिना कैफ, आदित्य रॉय कपूर आणि तब्बू स्टारर फितूर या सिनेमाची ट्रु स्टोरी जाणून घेऊयात... 

'फितूर'चं कथानक

ही कथा आहे फिरदॉस आणि नूरची... नूर (आदित्य रॉय कपूर) जो एक काश्मीरमध्ये वाढलाय. नूर अर्थातच फिरदॉसच्या (कतरिना कैफ) प्रेमात असतो. याच दरम्यान त्याची भेट होते फिरदॉसच्या आई बेगम हजरतसोबत, जी भूमिका साकारली आहे अभिनेत्री तब्बूनं...

सिनेमात अनेक चढ-उतार आहेत. पण खूप काही नाविन्य सिनेमात पहायला मिळत नाही... खरंतर फितूर हा सिनेमा पाहताना दिग्दर्शक अभिषेक कपूरनं सिनेमावर आणखी काम करण्याची गरज होती, असं सतत जाणवत राहतं. या सगळ्या गोष्टींचा परिणाम सिनेमाच्या फ्लो वर होताना दिसतो. 

सिनेमाची उजवी बाजू

हे सगळं घडत असताना केवळ दोनच गोष्टीं आहेत ज्या खऱ्या अर्थानं भावतात... एक म्हणजे अबिनेत्री तब्बूनं साकारलेली भूमिका... बेगम हजरत तर दुसरी गोष्ट म्हणजे काश्मीरचं सौंदर्य... काश्मीरचे देखणे लोकेशन्स, स्नॉ फॉल, शिकारा या सगळ्या गोष्टी मनाला भावतात.

सिनेमाची फसलेली मांडणी

फितूर ही एक लव्ह स्टोरी आहे... पण, कतरिना आणि आदित्य रॉय कपूर या दोघांचीही केमिस्ट्री प्रेक्षकांना अपील होत नाही. सिनेमाचं संगीत छान आहे.. सिनेमाची कथा छान आहे पण त्याची मांडणी फसलीये.. तेव्हा हे सगळे फॅक्टर्स पाहता आम्ही फितूर या सिनेमाला देतोय २.५ स्टार्स...