कसं पूर्ण होणार ‘जग्गा जासूस’चं शूटींग?

रणबीर कपूरचा आगामी चित्रपट ‘जग्गा जासूस’च्या शूटिंगसाठी उशीर होतोय, अशी कूजबूज संबंधित बॉलिवूड वर्तुळात कानी पडतेय. पण, या सगळ्या चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचं रणवीर कपूरनं सांगितलंय. 

Updated: Aug 20, 2014, 01:10 PM IST
कसं पूर्ण होणार ‘जग्गा जासूस’चं शूटींग? title=

मुंबई : रणबीर कपूरचा आगामी चित्रपट ‘जग्गा जासूस’च्या शूटिंगसाठी उशीर होतोय, अशी कूजबूज संबंधित बॉलिवूड वर्तुळात कानी पडतेय. पण, या सगळ्या चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचं रणवीर कपूरनं सांगितलंय. 

रणबीर आणि ‘बर्फी’फेम दिग्दर्शक अनुराग बासू यांच्या होम प्रोडक्शनमध्ये ‘जग्गा जासूस’ तयार होतोय. या सिनेमाच्या शूटींगसाठी उशीर होण्यात एकापेक्षा जास्त कारणं जबाबदार असल्याचं समजतंय.   

पहिल्यांदा काय तर चित्रपटाचा दिग्दर्शक सिनेमातील काही सीन्सवर संतुष्ट नव्हता. रणबीर आणि कतरिनाच्या लूकवर त्याला आणखीन काम करायचं होतं. दोघांचा या सिनेमातील लूक काहीसा वेगळा असावा, अशी त्याची इच्छा होती. 
तसंच अशीही माहिती मिळतेय, ‘जग्गा जासूस’च्या शूटींग शेड्युलमध्ये उशीर होण्याचं कारण कतरिना कैफही आहे.

कतरिना तिचा दुसरा सिनेमा ‘बँग बॅंग’मध्ये बिझी आहे. या सिनेमाचे काही सीन्सही पुन्हा शूट होत आहेत. या दरम्यान कतरिनाला ‘फॅन्टम’ची शूटींगही संपवायचीय. त्यातच, तिला सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यांत बँग-बँगच्या प्रमोशनसाठीही वेळ द्यायचाय... पाहा, केवढी बिझी आहे कतरिना... मग, ती ‘जग्गा जासूस’ला कधी वेळ देणार?

दुसरीकडे, रणबीरही त्याचे आगामी सिनेमे ‘तमाशा’ आणि ‘बॉम्बे वेल्वेट’मध्ये बिझी आहे. नोव्हेंबरमध्ये तो बॉम्बे वेल्वेटच्या प्रमोशनमध्ये बिझी राहील. अशा परिस्थितीत अनुराग बासूला सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत कतरिना आणि रणबीरची वेळ सांभाळत ‘जग्ग जासूस’ची शूटींग पूर्ण करण्याची कसरत करावी लागणार, असंच दिसतंय. 

‘जग्गा जासूस’ मे 2015 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जातंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.