अखेर हृतिक-सुझानच्या घटस्फोटावर वांद्रे कोर्टाकडून शिक्कामोर्तब

अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खानच्या घटस्फोटाला वांद्रे कोर्टानं कायदेशीर मान्यता दिलीय. दोन मुलांच्या ताब्याबाबत आता सुनावणी सुरू आहे. अखेर त्यांचं १४ वर्षांचं नातं कायदेशीरपणे संपुष्टात आलंय.

Updated: Nov 1, 2014, 01:43 PM IST
अखेर हृतिक-सुझानच्या घटस्फोटावर वांद्रे कोर्टाकडून शिक्कामोर्तब  title=

मुंबई: अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खानच्या घटस्फोटाला वांद्रे कोर्टानं कायदेशीर मान्यता दिलीय. दोन मुलांच्या ताब्याबाबत आता सुनावणी सुरू आहे. अखेर त्यांचं १४ वर्षांचं नातं कायदेशीरपणे संपुष्टात आलंय.

आज वांद्रे कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांनी स्वइच्छेनं घटस्फोट घेतला. कोर्टानं त्यावर शिक्कामोर्तब केलं. दोन्ही मुलांच्या कस्टडीबाबत मात्र अजून निर्णय व्हायचाय. 

मागील १७ वर्षांपासून हृतिक आणि सुझान एकमेकांना ओळखत होते. चार वर्षांच्या डेटिंगनंतर २० डिसेंबर २०००मध्ये त्यांनी विवाह केला. त्यांना रेहान आणि रिधान नावाचे दोन मुलंही आहेत. मागील वर्षी डिसेंबरमध्ये या जोडप्यानं वेगळा होण्याचा निर्णय जाहीर केला. दोघांनी एकमेकांवर कोणतेही आरोप केले नाहीत. सध्या अभिनेता हृतिक रोशन अभिनेत्री इशा गुप्तासोबत वेळ घालवतोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.