नगरच्या 'इपितर' किराणा दुकानदाराची जिद्द, बनला सिनेनिर्माता!

माणसामध्ये जिद्द असेल तर माणूस अशक्यही  शक्य करता येतं. अहमदनगर जिल्ह्यातील एका तरुणाने जिद्दीच्या जोरावर चक्क सिनेमाची निर्मिती केलीय.

Updated: Dec 26, 2015, 12:19 PM IST
नगरच्या 'इपितर' किराणा दुकानदाराची जिद्द, बनला सिनेनिर्माता! title=

निखिल चौकर, अहमदनगर : माणसामध्ये जिद्द असेल तर माणूस अशक्यही  शक्य करता येतं. अहमदनगर जिल्ह्यातील एका तरुणाने जिद्दीच्या जोरावर चक्क सिनेमाची निर्मिती केलीय.

अहमदनगर जिल्ह्याच्या सोनेवाडी राहणाऱ्या  या किरण बेरडचं एक छोटसं किराणामालाचं दुकान आहे. तसेच तो भाजीपाल्याची विक्री करतो. पण केवळ एक किराणा दुकानदार हीच त्याची ओळख नाही ..तर तो  सिनेमाचा निर्मातादेखील आहे. ऐकूण आश्चर्य वाटलं असलं तरी जिद्दीच्या जोरावर माणूस अशक्य ते शक्य करु शकतो असं म्हटलं जातं आणि हेच किरणने दाखवून दिलं आहे.

किरणला लहानपणापासूनच लिहिण्या वाचनाची आवड होती. डीएडपर्यंत शिक्षण झालेल्या किरणने सरकारी नोकरी करायची नाही अशी मानाशी खूनगाठ बांधली होती.त्यामुळेच त्यांनी जिल्हापरिषदेत शिक्षकाची नोकरी नाकारली. त्यामुळे पत्नी नाराज होती. पण, किरणला  काही तरी वेगळं करुन दाखवायचं होतं..त्यामुळे त्याने किराणा दुकान आणि  भाजीपाला विक्रीचा व्यवसाय स्विकारला..याच काळात्याने लेखन सुरु ठेवलं.

किरणने मित्रांच्या सल्ल्यानुसार सिनेमासाठी एक कथा लिहिली. त्यानंतर ती कथा रुपेरी पडद्यावर साकारण्याचं धाडस ग्रामीण भागातील या जिद्दी तरुणाने केलं..

'इपीतर' नावाच्या  या  सिनेमाचं चित्रीकरण अहमदनगर जिल्ह्यात करण्यात असून केवळ ३६ दिवसांमध्ये ते पूर्ण झाले आहे. येत्या ३-४ महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे.