मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या प्रेमात आता दुरावा आलाय की काय? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडतोय.
नुकताच, आपल्या घराच्या बाल्कनीत उभं राहून एकमेकांना किस करताना रणबीर-कतरिनाचा फोटो वायरल झाला होता. त्यानंतर, दीपिकामुळे या दोघांत अंतर पडतंय, अशा चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. परंतु, आता मात्र रणबीर लवकरच कतरिनासोबत उभारलेल्या आपल्या या आशियान्यातून बाहेर पडणार असल्याचं समजंतय.
सध्या, बांद्रा स्थित एका बिल्डिंगमध्ये रणबीर-कतरिना लिव्ह इनमध्ये एकत्र राहत आहेत. परंतु, लवकरच रणबीर या घरातून बाहेर पडणार आहे. त्याचे आईवडील ऋषी कपूर आणि नीतू सिंग हे देखील त्याच्यासोबत असणार आहेत. त्यांनी आपल्या या नव्या घरात रणबीरसोबत पूजादेखील घातलीय.
त्यामुळे, रणबीर-कतरिनाच्या ब्रेक अपच्या चर्चांणा पुन्हा एकदा उधाण आलंय.