सैराटमध्ये परश्याच्या जीवाला जीव देणाऱा बाळ्या पाहा कसा आहे...

सैराट चित्रपटातील आर्ची आण परश्या यांच्या भूमिकेसोबतच त्यातील एका पात्राचीही चर्चा सध्या सुरु आहे. तो म्हणजे परश्याचा मित्र बाळ्या उर्फ प्रदीप म्हणजेच तानाजी गळगुंडे.

Updated: May 12, 2016, 01:17 PM IST
सैराटमध्ये परश्याच्या जीवाला जीव देणाऱा बाळ्या पाहा कसा आहे... title=

मुंबई : सैराट चित्रपटातील आर्ची आण परश्या यांच्या भूमिकेसोबतच त्यातील एका पात्राचीही चर्चा सध्या सुरू आहे. तो म्हणजे परश्याचा मित्र बाळ्या उर्फ प्रदीप म्हणजेच तानाजी गळगुंडे.

मित्र असावा तर लंगड्यासारखा जीवाला जीव देणारा असं तानाजीच्या भूमिकेबाबत बोललं जातंय. त्याने भूमिकाही तितकीच जिवंतपणे रेखाटलीये हे विशेष. तानाजी गळंगुंडे हा परश्याचा अपंग मित्र आहे. मात्र तानाजी रिअल लाईफमध्येही अपंग आहे. मात्र त्याने या व्यंगावर मात करत त्याच्यातील जबरदस्त अभिनयाची चुणूक दाखवून दिलीये.

तानाजी सोलापूरमधील बेंबळे या गावात राहतो. नागराज यांना या चित्रपटासाठी परश्याचा मित्र म्हणून विशेष पात्र हवं होत. त्यामुळेच तानाजीची या पात्रासाठी निवड झाली.