'हम आपके है कौन'च्या गाण्यावर थिरकतेय पाकिस्तानी डान्सर

पाकिस्तानात बॉलिवूडच्या गाण्यांची भलतीच क्रेझ आहे. पाकिस्तानातील एका डान्सरचा भारतीय गाण्यावर डान्स करताना एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 

Updated: Oct 26, 2016, 07:16 PM IST
'हम आपके है कौन'च्या गाण्यावर थिरकतेय पाकिस्तानी डान्सर title=

मुंबई : पाकिस्तानात बॉलिवूडच्या गाण्यांची भलतीच क्रेझ आहे. पाकिस्तानातील एका डान्सरचा भारतीय गाण्यावर डान्स करताना एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 

सध्या पाकिस्तानी सरकारनं टीव्ही आणि केबलवर भारतीय सिनेमे आणि कार्यक्रम दाखवण्यास बंदी घातलीय. तरीही, माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांच्या बहुचर्चित 'हम आपके है कौन' या सिनेमातील एका गाण्यावर एका पाकिस्तानी डान्सरनं बैले डान्स करत आपला जलवा दाखवलाय. 

तिच्या या डान्सचाच व्हिडिओ यूट्यूबवर शेअर करण्यात आलाय... आणि हा व्हिडिओ सध्या जोरात व्हायरल होताना दिसतोय.