मुंबई: बॉलीवूड अभिनेता सलमान खान लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहेत. 27 डिसेंबरला सलमान आणि लुलिया वंतूर हे दोघं लग्न करणार असल्याची चर्चा आहेत. या बातम्यांवर आता खुद्द सलमान खाननंच स्पष्टीकरण दिलं आहे.
मला जेव्हा लग्न करायचं आहे, तेव्हा मी लग्न करीन. लग्नाबद्दल तुम्हाला काही सांगायची गरज मला वाटत नाही. लग्न करीन तेव्हा ट्विटर आणि फेसबूकवर त्याची घोषणा करीन, असं सलमान म्हणाला आहे.
सलमान आणि लुलिया हे दोघं प्रीती झिंटाच्या लग्नामध्ये एकत्र दिसले होते. तसंच सलमानची आई सलमा आणि लुलियाला मुंबई एअरपोर्टवर एकत्र पाहण्यात आलं होतं. लुलिया ही रोमनियातली टीव्ही स्टार आहे.