वाढदिवसाच्या निमित्तानं विराट - अनुष्का खुल्लमखुल्ला!

आपली पर्सनल लाईफ मीडियासोबत शेअर करणार नसल्याचं अनुष्काने प्रत्येक वेळी जाहीर केलंय. मात्र, आपल्या बॉयफ्रेण्डच्या बर्थडेच्या दिवशी अनुष्काने सगळीच बंधनं तोडली.

Updated: Nov 10, 2016, 12:43 PM IST
वाढदिवसाच्या निमित्तानं विराट - अनुष्का खुल्लमखुल्ला! title=

राजकोट : आपली पर्सनल लाईफ मीडियासोबत शेअर करणार नसल्याचं अनुष्काने प्रत्येक वेळी जाहीर केलंय. मात्र, आपल्या बॉयफ्रेण्डच्या बर्थडेच्या दिवशी अनुष्काने सगळीच बंधनं तोडली.

अनुष्काबरोबर साजरा केलेला बर्थडे विराट कदाचित विसरणार नाही. भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहलीने अनुष्का शर्माबरोबर राजकोटमध्ये आपला २८ वा वाढदिवस साजरा केला.

IMG-20161106-WA0005
खास केक

राजकोटमध्ये इंग्लंडबरोबर टेस्ट मॅच खेळण्यासाठी टीम इंडिया आलीय. विराटच्या टीममेट्सने पण विराटच्या वाढदिवसाची जय्यत तयारी केली होती. मात्र,  या सगळ्यांमध्ये विराट अनुष्काच्या स्पेशल बर्थडे सरप्राईजची वाट बघत होता. राजकोटमध्ये मीडियासमोर विराट आणि अनुष्का खुपचं कम्फर्टेबल दिसले.

IMG-20161106-WA0004
खास सेलिब्रेशन