कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता – राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे खुलासा केलाय. परप्रांतियांविरूद्धच्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगानं राज ठाकरेंवर नोटीस बजावली होती.
'शिवसेनाच स्वबळावर सत्ता स्थापन करणार'
शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय.
सर्वप्रथम निवडणूक निकाल कसा पाहणार रविवारी!
मुंबई : प्रिय नेटीझन्स लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही तुम्हांला जलद आणि अचूक निकाल दिला होता. त्यावेळी तुमच्या प्रेमामुळे आणि आमच्यावरील विश्वासामुळे झी २४ तासची वेबसाइट 24taas.com ला नंबर १ बनविले होते. यंदाही तुमच्या अपेक्षांना खरं उतरण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. १९ तारखेला अपटेड निकाल देण्यासाठी आमची संपूर्ण टीम सज्ज आहे. तुम्हांला २८८ मतदारसंघाचे सविस्तर निकाल आम्ही एका क्लिकवर देणार आहोत. तर कशी असेल आमची साइट निकालाच्या दिवशी याची एक झलक तुम्हांला दाखवत आहोत. यामुळे तुम्हांला झटपट निकाल तुमच्या मोबाईलवर तसेच तुमच्या डेस्कटॉपवर दिसणार आहेत.
औरंगाबादेत मतदान वाढले, दिग्गजांची उडाली झोप
जिल्ह्यात मतदानाचा टक्का चांगलाच वाढला आहे त्यामुळं अनेक दिग्गजांची आता झोप उडाली आहे. लोकसभेत वाढलेल्या टक्क्यांनं भल्याभल्यांची ताराबंळ उडवली आहे. त्यामुळं वाढलेला टक्का कुणाला फायदा देणार आणि कुणाचे नुकसान करणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
येवल्यात दुसऱ्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या महिलेला जाळले
येवल्यात लोकशाहीला काळिमा फासणारी घटना घडली. विशिष्ट उमेदवाराला मतदान केलं नाही, म्हणून एका महिलेला चक्क पेटवून देण्यात आलं. मात्र रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या या महिलेनं आपला जबाब फिरवल्यानं या घटनेतील गांभीर्य आणखीच वाढलंय.
निकालापूर्वीच पृथ्वीबाबांविरोधात नाराजीचा सूर, घमासान सुरू!
निवडणूक निकालांच्या आधीच काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांचं घमासान सुरू झालंय. पृथ्वीराज काँग्रेसमध्ये 'हिटलिस्ट'वर असतानाच मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांनी केलेलं विधान त्यांच्या पक्षातील विरोधकांसाठी आयतंच कोलीत देणारं ठरलंय.
पाहा किती आयाराम गयाराम आमदार होतील?
विधानसभा निवडणुकीपूर्वी जे उमेदवार इतर पक्षात होते, यानंतर भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेत दाखल झाले अशा उमेदवारांना किती प्लस पॉइंट किंवा मायनस पॉइंट होणार आहे याचा हा अंदाज.
खळबळजनक, गुजरातचे हजारो बोगस मतदार मुंबईत!
राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदान पार पडल्यानंतर गुजरातची हजारो बनावट पॅनकार्डस् भाईंदरच्या राई गावातील खाडी पुलाजवळ फेकून दिल्याचे आढळून आले आहे. त्यावरून मुंबईतील मतदानासाठी हजारो बोगस मतदार गुजरातमधून आणण्यात आल्याचा संशय बळावला आहे.
ती विधानं अनावधानानं केली होती, पृथ्वीराजांची दिलगिरी
आदर्श प्रकरणी काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी 'टेलिग्राफ' या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त विधान केलं होतं... ही विधानं माझ्याकडून अनावधानानं केली गेली, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केलीय.
मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधूनी एकत्र यावे - नांदगावकर
निवडणुकीपूर्वी एकत्र आले नाहीत मात्र आता निवडणुकीनंतर तरी दोघा ठाकरे बंधूनी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं, असं आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलंय.
२८८ मतदारसंघात कोणाला आहे प्लस पॉइंट
मतदानानंतर अनेक रिसर्च कंपन्यांनी त्यांचा एक्झीट पोल सादर केला. या कंपन्यांनी भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून अंदाज व्यक्त केला आहे. आम्ही तुम्हांला तुमच्या मतदारसंघात आमदार कोण होणार याबद्दल विचारले होते. त्यानुसार झी २४ तासच्या वेबसाइट, फेसबूक पेज, ट्विटर आणि मेल बॉक्सवर तुम्ही भरभरून प्रतिक्रिया दिल्यात. त्यातील माहितीचे वर्गीकरण करून पुढील निष्कर्ष आले आहेत.
काँग्रेसबाबत 'ते' विधान अनवधानाने - पृथ्वीराज चव्हाण
अनौपचारिक गप्पांमध्ये अनवधानाने केलेल्या विधानाची बातमी करून छापल्याचा खुलासा पृथ्वीराज चव्हाणांनी आता केला आहे.
कुडाळमध्ये राडा, नागरिक-पोलीस यांच्यात बाचाबाची
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या राखीव पोलिस दलाचे पोलीस आणि कुड़ाळमधील स्थानिक नागरिक यांच्यात आज दुपारी राडा झाला.
निकालानंतर राष्ट्रवादीसोबत जाणार नाही - खडसे, तावडे
शिवसेना-भाजप युती तुटल्याने कार्यकर्ते खुश होते. आम्हाला चांगले यश मिळेल. भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीला राज्यात पूर्ण बहुमत मिळेल. मात्र, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काही जागा कमी पडल्यास भाजप कोणत्याही स्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जाणार नाही, असे भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
एक्झिट पोलनंतर सट्टेबाजांची भाजपलाच पसंती
एक्झिट पोलपाठोपाठ, आता सट्टेबाजांनीही भाजपच्याच पारड्यात महाराष्ट्रातील सत्तेचा कौल टाकलाय... महाराष्ट्रात काय नवीन समीकरणं असतील आणि कोण मुख्यमंत्री होईल, याबाबत सट्टेबाजांची गणित मांडणारा हा रिपोर्ट. महाराष्ट्रात भाजपलाच सर्वाधिक जागा मिळणार, याबाबत सट्टेबाजांनीही शिक्कामोर्तब केलंय.
तुमच्या मतदार संघात कोणाला प्लस पाइंट
मतदान होऊन २० तास झाले... मतदानानंतर अनेक रिसर्च कंपन्यांनी त्यांचा एक्झीट पोल सादर केला. या कंपन्यांनी भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून अंदाज व्यक्त केला आहे. तुम्हांला काय वाटते... तुमच्या मतदार संघात कोण विजय होणार... कोणाची होती हवा... कोणाला झाले जास्त मतदान... तुम्हीही पण बना एक्झीट पोलचे चाणक्य...
पटेलांच्या 'टिवटिव'नं उभे राहिले भल्याभल्यांचे कान!
१९ ऑक्टोबर २०१४ ला सर्वच राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार आहे. मात्र, त्यापूर्वीच आघाड्या आणि युतीच्या चर्चांना जोरदार उधाण आलंय... आणि आता त्याला हवा दिलीय राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी...
शिवसेनेबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही - देवेंद्र फडणवीस
शिवसेनेने आमच्यावर केलेल्या टीकेचे शल्य मनात अजून आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
‘चाणक्य’च्या एक्झिट पोलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत!
‘चाणक्य’च्या एक्झिट पोलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय. भाजपला नंबर एक, तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरणार आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असतील असा अंदाज आहे. मनसेला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागणार असल्याचं दिसतंय.
पाहा, सगळे एक्झिट पोल... एकाच ठिकाणी!
आज महाराष्ट्र विधानसभा २०१४ साठी संपूर्ण राज्यभर मतदान पार पडलंय. राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय. १९ तारखेला या निवडणुकीचे निकाल जाहीर होतीलच पण, त्यापूर्वी अनेक संस्थांनी आपले 'एक्झिट पोल' जाहीर केले आहेत...