ऑडिट विधानसभा मतदारसंघ - तुमसर, भंडारा
भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदार संघ पूर्वी भाजपचा गड समजला जाई. मात्र 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर अनिल बावनकर यांनी विजयी पताका फडकावली आणि हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला.
ऑडिट विधानसभा मतदारसंघ - साकोली, भंडारा
भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघ. इथले आमदार नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करत खासदारकी मिळवलीयं.
ऑडिट विधानसभा मतदारसंघ - यवतमाळ
यवतमाळ विधानसभा मतदारसंघ. यवतमाळ जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघापैकी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या उमेदवारांची संख्या पाहता सर्वाधिक धुमशान यवतमाळमध्ये होण्याची चिन्हं आहेत. प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळा कौल हे येथील खास वैशिष्ट्य.
ऑडिट विधानसभा मतदारसंघ - आर्णी, यवतमाळ
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला यवतमाळचा आर्णी विधानसभा मतदारसंघ. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे येथून प्रतिनिधित्व करतात.
ऑडिट विधानसभा मतदारसंघ - पुसद, यवतमाळ
पुसद मतदारसंघ म्हणजे नाईक घराणे. पहिल्या निवडणुकीपासून नाईक घराण्यातील सदस्यच येथून निवडून आलेला आहे. वसंतराव नाईक आणि सुधाकर नाईक असे दोन मुख्यमंत्री या मतदारसंघाने राज्याला दिले. सध्या इथे राष्ट्रवादीचे मनोहर नाईक नेतृत्व करतात.
ऑडिट विधानसभा मतदारसंघ - धुळे ग्रामीण
धुळे ग्रामीण मतदारसंघ. एकेकाळी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून लक्ष वेधणारे रोहिदास पाटील यांना याच मतदारसंघात गेल्यावेळी पराभूत व्हावं लागलं. शिवसेनेच्या शरद पाटील यांनी त्यांचा पराभव केला.
ऑडिट विधानसभा मतदारसंघ - धुळे शहर
धुळे शहर विधानसभा मतदारसंघात अनिल गोटे विद्यमान आमदार आहेत. जातीची समीकरणं मांडत धुळ्यातल्या राजकारणाची गणितं मांडली जातात. पांझरा नदीच्या मध्यमागी मुंबई आग्रा आणि सुरत नागपूर या दोन राष्ट्रीय महामार्गांवर वसलेलं हे धुळे शहर.
ऑडिट विधानसभा मतदारसंघ - नंदूरबार
नंदूरबार विधानसभा मतदारसंघ. तब्बल चारवेळा निवडून आलेल्या आणि राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या डॉ. विजयकुमार गावित यांनी आता भाजपची वाट धरली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नंदूरबारमध्ये खरी चुरस निर्माण झाली आहे.