Maharashtra Assembly Elections 2014

"राजच्या तब्येतीसाठी फोन केला, इतरांची तब्येत का बिघडते?"

"राजच्या तब्येतीसाठी फोन केला, इतरांची तब्येत का बिघडते?"

 शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना केलेल्या फोनविषयी स्पष्टीकरण देतांना म्हटलंय, "मी राजच्या तब्बेतीसाठी फोन केला असेल, तर इतरांची तब्बेत का बिघडते?". राज ठाकरे काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी गेले होते, त्यावेळी राज ठाकरे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ते मुंबईत परतले होते.

Oct 1, 2014, 01:30 PM IST
भाजपमध्ये 40 'आयाराम' उमेदवार

भाजपमध्ये 40 'आयाराम' उमेदवार

भाजपने 40 आयारामांना उमेदवारी दिल्याने, वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते नाराज झाले आहे. भाजपनेच नव्हे तर अनेक पक्षांनी हा फंडा आजमवलाय. पण भाजपमध्ये यावेळी आयारामांची संख्या 40 असल्याने भाजपसाठी ही चिंतेची बाब ठरू शकते.

Oct 1, 2014, 12:37 PM IST
विठ्ठलाचं दर्शन घेऊन होणार मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात

विठ्ठलाचं दर्शन घेऊन होणार मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विधानसभा निवडणूक कार्यक्रम अजून जाहीर झाला नसला तरी भाजपा मोदींना लवकरात लवकर राज्याच्या दौऱ्यावर आणण्याच्या प्रयत्नात आहे.

Oct 1, 2014, 10:57 AM IST
पृथ्वीराजांची 'तशी' मानसिकताच नव्हती  - शरद पवार

पृथ्वीराजांची 'तशी' मानसिकताच नव्हती - शरद पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आघाडी तुटल्याचं खापर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज यांच्यावर फोडलंय. ते पुण्यात बोलत होते. 

Oct 1, 2014, 10:41 AM IST
महाराष्ट्रात... हाथी चले अपनी चाल!

महाराष्ट्रात... हाथी चले अपनी चाल!

गेल्या काही निवडणुकांमधल्या निकालावरुन विदर्भात बहुजन समाज पक्षाचा प्रभाव वाढत चालल्याचं दिसून येतंय..गेल्या दोन लोकसभांच्या निकालावरुन तर यंदाच्या विधानसभेत बसपाची भूमिका निर्णायक ठरु शकते.

Oct 1, 2014, 09:48 AM IST
बंडोबांना थंडोबा करण्याची शेवटची संधी

बंडोबांना थंडोबा करण्याची शेवटची संधी

विधानसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने, प्रत्येक पक्षातील बंडोबांना थंडोबा करण्याची आज शेवटची संधी आहे. 

Oct 1, 2014, 08:52 AM IST
काँग्रेसमुळं आघाडी तुटली नाही- सोनिया गांधी

काँग्रेसमुळं आघाडी तुटली नाही- सोनिया गांधी

काँग्रेसमुळं आघाडी तुटलेली नाही, असं स्पष्टीकरण काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलंय. माझ्यामुळं किंवा राहुल गांधींमुळं आघाडी तुटलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं. 

Sep 30, 2014, 09:36 PM IST
काटोलचे अपक्ष उमेदवार प्रमोद चाफळे यांच्यावर गोळीबार

काटोलचे अपक्ष उमेदवार प्रमोद चाफळे यांच्यावर गोळीबार

निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांवर चिखलफेक करणं आपल्याला माहित आहे. पण नागपूरच्या काटोल मतदारसंघात एका अपक्ष उमेदवारावर गोळीबार झाला आहे. प्रमोद चाफळे असं या उमेदवाराचं नाव असून गोळीबारात चाफळे थोडक्यात बचावले आहेत.

Sep 30, 2014, 09:01 PM IST
विनोद तावडेंनी निवडला सुरक्षित मतदारसंघ

विनोद तावडेंनी निवडला सुरक्षित मतदारसंघ

भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या बोरीवली विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते विनोद तावडे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. समोर तुल्यबळ उमेदवार नसल्यानं ही लढत त्यांच्यासाठी सोपी असली तरी विरोधकांकडून मात्र मतदारसंघाबाहेरचा उमेदवार म्हणून मुद्दा उपस्थित केला जातोय. 

Sep 30, 2014, 08:45 PM IST
माहिममध्ये मनसे शिवसेनेत चुरशीची लढत

माहिममध्ये मनसे शिवसेनेत चुरशीची लढत

माहिम मतदारसंघात प्रचाराला जोरदार सुरुवात झालीय. मनसे आणि शिवसेना दोन्ही उमेदवारांमध्ये याठिकाणी चुरशीची लढत होणार आहे. मनसेनं पुन्हा एकदा नितिन सरदेसाई यांना संधी दिलीय. तर शिवसेनेनं सदा सरवणकर यांना रिंगणात उतरवलंय. 

Sep 30, 2014, 06:48 PM IST
भाजपचा अब्जाधीश उमेदवार

भाजपचा अब्जाधीश उमेदवार

निवडणूक आयोगाने उमेदवारांना संपत्तीचं विवरण देणे, अनिवार्य केल्यानंतर उमेदवारांच्या संपत्तीचे दाखले बाहेर येत आहेत.

Sep 30, 2014, 04:58 PM IST
एनडीएतून बाहेर पडण्याविषयी उद्धव ठाकरेंचा यूटर्न

एनडीएतून बाहेर पडण्याविषयी उद्धव ठाकरेंचा यूटर्न

अनंत गिते केंद्रीयमंत्रीपदाचा राजीनामा देणार अशी गर्जना केल्याच्या २४ तासांच्या आतच उद्धव ठाकरेंनी मंगळवारी यूटर्न घेतलाय. एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेतून परतल्यावर त्यांच्याशी चर्चा करुन घेणार, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. 

Sep 30, 2014, 04:21 PM IST
विधानसभा निवडणुका... कुठे गेलं साहेबांचं महिला धोरण?

विधानसभा निवडणुका... कुठे गेलं साहेबांचं महिला धोरण?

विधानसभा निवडणुकांसाठी जागा वाटपावर नजर टाकली तर महिलांना समान संधी तर सोडाच परंतु महिलांच्या पदरात पुरुष उमेदवारांच्या तुलनेत एक टक्का जागा आल्याचं ढळढळीत सत्य तुमच्यासमोर येईल. 

Sep 30, 2014, 02:05 PM IST
'अखंड महाराष्ट्र ठेवणाऱ्यांनाच शिवछत्रपतींचा आशीर्वाद'

'अखंड महाराष्ट्र ठेवणाऱ्यांनाच शिवछत्रपतींचा आशीर्वाद'

अखंड महाराष्ट्र ठेवणाऱ्यांनाच शिवछत्रपतींचा आशीर्वाद मिळेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. भाजपने 'शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ', अशी जाहिरात केली आहे.

Sep 30, 2014, 01:26 PM IST
गेल्या १० वर्षांतलं भुजबळांच्या 'संपत्ती'चं भरभक्कम बांधकाम!

गेल्या १० वर्षांतलं भुजबळांच्या 'संपत्ती'चं भरभक्कम बांधकाम!

राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते... छगन भुजबळ... संपत्तीच्या बाबतीतही ते हेवीवेटच आहेत... विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं भुजबळांना पुन्हा एकदा आपली संपत्ती जाहीर करावी लागलीय. यानिमित्तानं भुजबळांची संपत्ती गेल्या दहा वर्षांत केवढी वाढलीय, हे बघितल्यानंतर तुमच्यासमोर त्यांच्या बांधकामाच्या 'भरभक्कम'पणाची प्रचिती नक्कीच येईल.

Sep 30, 2014, 01:22 PM IST
भाजपला धक्का; सोनबा मुसळेंचा अर्ज बाद

भाजपला धक्का; सोनबा मुसळेंचा अर्ज बाद

नागपूर भाजपला मोठा धक्का बसलाय. भाजपचे उमेदवार  सोनबा मुसळे यांचा अर्ज रद्द करण्यात आलाय. मुसळे हे भाजपचे सावनेर मतदार संघातले उमेदवार होते. 

Sep 30, 2014, 12:32 PM IST
महायुती फुटल्याने प्रतिमोदी निराश

महायुती फुटल्याने प्रतिमोदी निराश

गेल्या २५ वर्षांची शिवसेना – भाजप युती संपुष्टात आल्यानं या दोन्ही पक्षांना एकदिलानं मानणाऱ्या अनेकांचा हिरमोड झालाय. त्यातीलच एक आहेत... ‘प्रतिमोदी’ म्हणून प्रसिद्ध असणार विकास महंते...

Sep 30, 2014, 12:11 PM IST
राज ठाकरे आणि नितिन गडकरींच्या भेटीची शक्यता

राज ठाकरे आणि नितिन गडकरींच्या भेटीची शक्यता

राज ठाकरे आणि नितिन गडकरी यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण अमरावतीत एकाच हॉटेलात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी उतरले आहेत. 

Sep 30, 2014, 11:22 AM IST
कोल्हापुरात रंगतदार सामने... एकाच कुटुंबात तीन झेंडे!

कोल्हापुरात रंगतदार सामने... एकाच कुटुंबात तीन झेंडे!

राजकारणात काहीही होऊ शकतं हे वारंवार अनेक उदाहरणांनी सिद्ध होतं. आज एका पक्षात निष्ठावंत असणारा कार्यकर्ता संध्याकाळ होण्याअगोदर दुसऱ्या पक्षात डेरेदाखल झालेला असतो. एवढंच नव्हे तर सध्या अनेक ठिकाणी वडील एका पक्षात, मुलगा दुसऱ्या पक्षात तर भाऊ तिसऱ्याच पक्षात असं चित्र पहायला मिळतंय. कोल्हापुरातही असंच काहीसं चित्र पहायला मिळतंय.  

Sep 29, 2014, 09:26 PM IST
विधानसभा २०१४ : शिवसेना उमेदवारांची संपूर्ण यादी

विधानसभा २०१४ : शिवसेना उमेदवारांची संपूर्ण यादी

शिवसेना उमेदवार विधानसभा निवडणूक - 2014 नंदुरबार (जिल्हा)

Sep 29, 2014, 08:41 PM IST